सावंतवाडी तालुक्यात परप्रांतीय युवक नदीपात्रात बुडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 23:27 IST2024-05-17T23:26:51+5:302024-05-17T23:27:05+5:30
ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

सावंतवाडी तालुक्यात परप्रांतीय युवक नदीपात्रात बुडला
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथील नदीपात्रात बुडून परदेशीया जितू उराव ( २०, मूळ रा. सुपा–झारखंड, सध्या रा. भालावल) या युवकांचा बुडून मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत भालावल येथील उदय परब यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परदेशीया हा उदय परब यांच्या बागेत गेली ४ वर्षे काम करत आहे. आपल्या सहकारी कामगारासोबत तो बागेच्या लगत असलेल्या नदीत पाण्याचा पंप जोडत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.
लगतच्या कामगारांने याबाबतची माहिती मालक परब यांच्यासह स्थानिकांना दिली. त्यानंतर पाण्यात शोधाशोध केली असता सायंकाळी उशीरा स्थानिकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी बी पालकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.