शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: प्रवासादरम्यान खासगी बसमधून व्यापाऱ्याचे दागिने लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 30, 2024 15:24 IST

कणकवली : गोवा ते मुंबई जाणाऱ्या एका खासगी बसने प्रवास करणाऱ्या सोने व्यापाऱ्याचे चोरट्याने रोख रक्कमेसह दागिने लंपास केले. ...

कणकवली : गोवा ते मुंबई जाणाऱ्या एका खासगी बसने प्रवास करणाऱ्या सोने व्यापाऱ्याचे चोरट्याने रोख रक्कमेसह दागिने लंपास केले. दरम्यान नांदगाव येथील एका हॉटेलमध्ये बस जेवण्यासाठी थांबली असताना ते हॉटेल मध्ये जेवायला गेले. तेवढ्यात त्यांच्या बॅगेतील ६० हजार किंमतीची सोन्याची नथ व रोख रक्कम ३ हजार रुपये लांबवले. काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी भैय्यासाहेब मोतीराम मोरे (वय ५४ रा. चारकोप , कांदिवली) हे गोव्यात सोन्याच्या विक्रीचा व्यवसाय गेले अनेक वर्षे करतात. काल गुरुवारी ते डॉल्फिन या खासगी बसने गोव्यावरुन मुंबईकडे प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या बॅगेत शिल्लक राहिलेल्या सोन्याच्या नथ होत्या. नांदगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बस थांबली असता ते जेवायला गाडीतून उतरले. जेवण झाल्यानंतर पुन्हा गाडीत आले असता बॅगची चैन उघडी दिसली. बॅगेत बघितल्यावर सोन्याच्या नथ तसेच रोख ३ हजार रुपयांची रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तात्काळ त्यांनी कणकवली पोलिसांची संपर्क साधला. खासगी बस पोलीस ठाण्यात आणण्यात आली. सर्व प्रवाशांकडे चोरीबाबत विचारणा केल्यानंतर रात्री उशीरा बस मुंबईकडे रवाना झाली. मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस