शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील उड्डाणपुलाच्या खालील भागाला मोठा तडा, काँक्रीटचा काही भाग कोसळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:53 IST

तंत्रज्ञांची टीम येणार

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणांतर्गत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. शहरातील या उड्डाणपुलाच्या पिलर क्रमांक तीनच्या ठिकाणी पिलरच्या जॉइंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालील सर्व्हिस रस्त्याच्या बाजूस काँक्रीटच्या काही भागांना मोठा तडा गेल्याची घटना समोर आली आहे. तसेच साधारण तीन ते चार फुटांचा एक काँक्रीटचा तुकडादेखील निघालेल्या स्थितीत दिसून येत आहे. तो सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी किंवा वाहनांवर कोसळण्याचीदेखील भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे या पुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रीजचा काही भाग यापूर्वी कोसळला होता. त्यानंतर झालेले आंदोलन व घडलेल्या घटना यांनी कणकवलीतील उड्डाणपूल व बॉक्सेल ब्रीज हे चर्चेत आले होते. याच बॉक्सेल ब्रीजचा एस. एम. हायस्कूलजवळचा एक भाग खचल्याने, तर दुसऱ्या बाजूचा काही भाग कोसळल्याने गेली तीन वर्षे पुलावर या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावलेली आहेत. परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही.कणकवलीत उड्डाणपुलाचा पिलर क्रमांक तीन हा स्टेट बँकेसमोर आहे. या पिलरवर उड्डाणपुलाच्या वरील काँक्रीटचे दोन्ही भाग ज्या ठिकाणी एकत्रित होतात, त्यापासून रस्त्याची पुलावरच्या संरक्षक भिंतीपर्यंतच्या पुलाच्या खालील भागाला पूर्णतः भेग गेल्याचे दिसत आहे. त्याठिकाणी काँक्रीटचा काही भाग भविष्यात कोसळू शकतो.तंत्रज्ञांची टीम येणारया संपूर्ण प्रकाराबाबत महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, शनिवारी त्या जागेची पाहणी केली असून, येत्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी येणार आहे. त्यानंतर याबाबत पुढील उपाययोजना काय कराव्या लागतील किंवा यासंदर्भात धोका आहे का, हे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.