शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

Sindhudurg: अज्ञातवासात गेलेला ‘तो’ हत्तींचा कळप परतला, भातकापणीच्या तोंडावर शेतकरी चिंतातुर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:49 IST

ओंकार हत्तीवर लक्ष ठेवून असलेल्या वन विभागाची या परतलेल्या हत्तींमुळे झोप उडणार

दोडामार्ग : गेल्या महिन्याभरापासून अज्ञातवासात गेलेला चार हत्तींचा कळप पुन्हा तिलारी खोऱ्यात परतला आहे. मुळस-हेवाळे परिसरात सध्या त्याचा वावर आहे. ऐन भातकापणीच्या हंगामात हा कळप परत आल्याने शेतकऱ्यांची तर चिंता वाढली आहेच, पण गेल्या काही दिवसांपासून इन्सुली परिसरात फिरणाऱ्या ओंकार हत्तीवर लक्ष ठेवून असलेल्या वन विभागाची या परतलेल्या हत्तींमुळे झोप उडणार आहे.दोडामार्ग तालुक्यात ओंकार हत्ती सोडून आणखी पाच हत्तींचा कळप वास्तव्यास होता. त्यांपैकी बाहुबली टस्कर घाटमाथ्यावर परत गेला होता. तर, ओंकार हत्ती गोव्याची सफर करून मडूरामार्गे बांदा-इन्सुली परिसरात दाखल झाला. दरम्यानच्या काळात उरलेल्या चार हत्तींच्या कळपाने कोलझर-झोळंबे परिसरात केलेल्या नुकसानीमुळे तिथला बागायतदार कोलमडून गेला होता.मात्र, महिनाभरापूर्वी हा चार हत्तींचा कळप अचानकपणे अज्ञातवासात गेला. तो कुठे गेला? याचा मागमूस वन विभागालाही नव्हता. नुकसानसत्र थांबल्याने शेतकरी खुश होता तर इन्सुली परिसरात फिरणाऱ्या ओंकार हत्तीवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याने वन विभागाला थोडासा दिलासा मिळाला होता. पण, आता पुन्हा महिनाभराच्या विश्रांतीनंतर हा कळप परतल्याने वन विभागाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

तिलारी खोऱ्यात चार हत्तींचा कळप जरी परतला असला तरी त्या कळपाला भातशेती, बागायती किंवा लोकवस्तीपासून दूर ठेवण्याकरिता हाकारी टीम तैनात ठेवण्यात आली आहे. आपल्याकडे ५० कर्मचाऱ्यांची टीम असून, त्यातील काही जण ओंकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले आहेत, तर उरलेले हेवाळे परिसरात लक्ष देतील. - सुहास पाटील, प्रभारी वनक्षेत्रपाल, दोडामार्ग 

गेला महिनाभर या चार हत्तींचा कळप अज्ञातवासात होता. मात्र, ऐन भातकापणीच्या हंगामात हा कळप परत आल्याने चिंता वाढली आहे. शेतकरी आधीच अवकाळी पावसामुळे नुकसानीत आहे. त्यात हत्तींचे संकट असल्याने या कळपाकडून कसे नुकसान होणार नाही याकडे वन विभागाने पाहावे व तसे नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. - तेजस देसाई, उपसरपंच केर - भेकुर्ली ग्रामपंचायत

English
हिंदी सारांश
Web Title : Elephant herd returns to Sindhudurg, farmers worried about harvest.

Web Summary : A herd of four elephants returned to Tilari valley, Sindhudurg, causing anxiety among farmers during harvest. The forest department is now tasked with managing both this herd and the lone elephant, Onkar.