जामसंडे येथील किराणा व्यावसायिकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 10, 2022 14:22 IST2022-09-10T14:18:41+5:302022-09-10T14:22:15+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण वातकर हे जामसंडे विष्णूनगर येथे राहत होते. ते अविवाहीत असून तेथेच त्यांचे किराणा मालाचे दुकान होते.

A grocer in Jamsande committed suicide by jumping into a well | जामसंडे येथील किराणा व्यावसायिकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

जामसंडे येथील किराणा व्यावसायिकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

देवगड (सिंधुदुर्ग) - तालुक्यातील जामसंडे विष्णूनगर येथील किराणा व्यावसायिक श्रीकृष्ण मनोहर वातकर (३५) यांनी आपल्या घराशेजारील विहीरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. ही घटना १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा. सुमारास निदर्शनास आली. मानसिक स्थिती बिघडल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण वातकर हे जामसंडे विष्णूनगर येथे राहत होते. ते अविवाहीत असून तेथेच त्यांचे किराणा मालाचे दुकान होते. गेली काही वर्षे ते किराणा मालाचे दुकान चालवित होते. त्यांच्यासमवेत घरी त्याचा भाऊ व भावजय अशी एकूण तीन माणसे राहत होती.
 

Web Title: A grocer in Jamsande committed suicide by jumping into a well