कणकवली : शिवजयंतीचे औचित्य साधून कणकवली शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते दिमाखात पार पडले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्द प्रशासनाने दिला आहे.या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, सतीश सावंत, संदेश सावंत, अबिद नाईक, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, एड. उमेश सावंत, मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत, मनोज रावराणे, सावी लोके, मुख्याधिकारी गौरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय यंत्रणा कामाला लागणारकार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आश्वासित केले की, शासनाच्या वतीने या सांस्कृतिक भवनाचे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुढील वर्षभरात हे भवन उभे राहील, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.
कलेचा आणि संस्कृतीचा सन्मानयावेळी 'अक्षरसिंधू कलामंच'च्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने भाई परब यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या प्रकल्पाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजयकुमार सर्वगोड यांनी केले.
Web Summary : Kankavli will soon have a Maratha Cultural Center. Guardian Minister Nitesh Rane performed the groundbreaking ceremony on Shiv Jayanti. The project, funded by the District Planning Committee with ₹8 crore, is expected to be completed within a year. The administration is committed to its timely and high-quality completion.
Web Summary : कणकवली में जल्द ही मराठा सांस्कृतिक भवन बनेगा। संरक्षक मंत्री नितेश राणे ने शिव जयंती पर भूमिपूजन किया। जिला योजना समिति द्वारा वित्त पोषित ₹8 करोड़ की परियोजना एक वर्ष के भीतर पूरी होने की उम्मीद है। प्रशासन समय पर और उच्च गुणवत्ता वाले निर्माण के लिए प्रतिबद्ध है।