शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

गुंगीचे औषध देऊन एका जोडप्याने रिक्षा व्यावसायिकाला लुटले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ

By सुधीर राणे | Updated: September 28, 2022 13:50 IST

कणकवली : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने करून घेऊन जात तळेरे येथील चालकाला गुंगीचे औषध देऊन एका जोडप्याने लुटल्याची ...

कणकवली : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने करून घेऊन जात तळेरे येथील चालकाला गुंगीचे औषध देऊन एका जोडप्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली. सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह तब्बल ८४ हजार ५०० रुपये या जोडप्याने लंपास केले. याप्रकरणी कणकवली पोलिसात संशयित जोडप्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.रिक्षा चालक संजय तुकाराम तळेकर (वय-६५ तळेरे – गावठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ सप्टेंबर रोजी एक जोडपे तळेरे बस स्टँड जवळ तळेकर यांच्या रिक्षेकडे जात तळेबाजार येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत सुमारे दोन ते अडीच वर्षाचे एक लहान मूल देखील असल्याचेही तक्रारदार यांनी म्हटले आहे. या जोडप्याने तळेबाजार येथील देवी मंदिराकडे जायचे असल्याचे सांगितले. त्यावर तळेकर यांनी १ हजार रुपये भाडे होईल असे सांगितले. ते भाडे मान्य झाल्याने त्या जोडप्याला मुलासह तळेकर हे देवीच्या मंदिराजवळ घेऊन गेले.तेथून कुणकेश्वर येथे जायचे आहे असे सांगितले. यावेळी तळेकर यांनी रिक्षा देवगड रोडच्या दिशेने घेतली. याच दरम्यान त्या जोडप्याने आम्ही गणपतीपुळे येथील देवदर्शनाचा पेढा आणला आहे तो घ्या असे सांगत चालक तळेकर यांना पेढा दिला. व त्यानंतर देवगड जामसडे येथे रिक्षा आली असता रिक्षा एका टपरी जवळ थांबवण्यास सांगितली. रिक्षा थांबवल्यावर त्या जोडप्याने तळेकर यांना एक थंड पेयाची बाटली आणून दिली. यानंतर आम्हाला कुणकेश्वर येथे जायचे नाही असे सांगत पुन्हा तळेरे स्टॅन्ड येथे सोडा असे सांगितले. त्यानंतर पुढे काय घडले हे मला आठवत नसल्याचे तळेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान तळेकर यांना तेथील रिक्षा चालकांनी व नागरिकांनी कणकवलीत एका खासगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. शुद्धीवर येताच त्यांना आपण लुटलो गेल्याचे लक्षात आले. सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्या जोडप्याने लंपास केल्याची तक्रार तळेकर यांनी दिली आहे. त्यानुसार संशयित जोडप्याच्या विरोधात भा द वि कलम ३२८, ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस