सहा महिन्यात ९२३१ जोडण्या
By Admin | Updated: October 21, 2014 23:38 IST2014-10-21T22:38:50+5:302014-10-21T23:38:28+5:30
महावितरण हायटेक : संगणकीकृत व्यवहार सुरू झाल्याने कामाला वेग

सहा महिन्यात ९२३१ जोडण्या
रत्नागिरी : महावितरणकडून मागेल त्याला वीजजोडणी देण्यात येत आहे. महावितरणकडून सर्व व्यवहार संगणकीकृत करण्यात आल्याने वीज जोडणीसाठी अर्जही आॅनलाईन करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात महावितरणकडून जिल्ह्यात ९२३१ वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत.घरगुती वीज जोडण्या रत्नागिरी विभागात ३७०४, चिपळूण विभागात २११८, खेड विभागात १६६२ तर जिल्ह्यात एकूण ७४८४ जोउण्या देण्यात आल्या आहेत. वाणिज्य जोडण्या रत्नागिरी विभागात ५५५, चिपळूण विभागात २६१, खेड विभागात २३३ तर जिल्ह्यात १०४९ जोडण्या देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक पथदीपांच्या रत्नागिरी विभागात ६३ ,चिपळूण विभागात ३५, अशा जिल्ह्यात एकूण ९८ जोडण्या देण्यात आल्या आहेत. शेतीपंपाच्या रत्नागिरी विभागात २२५, चिपळूण विभगात ८६, खेड विभागात ११४ अशा संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४२५ जोडण्यात देण्यात आल्या आहेत. लघुदाब वाहिनीवरील औद्योगिक वीज जोडण्या ६८ देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात ३९, चिपळूण विभागात १३, खेड विभागात १६ जोडण्या देण्यात आल्या आहेत. लुघदाब वाहिनीवरील अन्य ५३ जोडण्या देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात ३३, चिपळूण विभागात ७, खेड विभागात २२ जोडण्या देण्यात आल्या आहेत. उच्च दाब वाहिनीच्या औद्योगिक वीज जोडण्यात रत्नागिरी विभागात २ तर खेड व चिपळूण विभागात प्रत्येकी एक मिळून एकूण ४ जोडण्यात देण्यात आल्या आहेत. तर उच्च दाब वाहिनीवरील जिल्ह्यातील एकमेव वीजजोडणी चिपळूण विभागात देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार होत असून जिल्ह्यात सेकंड होमसाठी परजिल्ह्यातील ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे सहाजिकच दरवर्षी वीजजोडण्या वाढत असल्याचे दिसत आहे. महावितरणने कामकाज पारदर्शी व्हावे यासाठी संगणीकृत पध्दतीने कार्यालये जोडली आहेत. त्यामुळे मागणीसुध्दा वाढत आहे. महावितरणकडून सध्या दरमहा सरासरी १५०० वीज जोडण्या देण्यात येत आहेत. तरीही जिल्ह्यात घरगुती ५५६४, कृषी पंप ९३७, औद्योगिक ११४, सार्वजनिक पाणीपुरवठा ९२, पथदीप ८८, उच्चदाब औद्योगिक ६ वीजजोडण्या अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित वीजजोडण्या देण्याचे काम सुरू असून लवकरच त्या १०० टक्के पूर्ण केल्या जातील, असे कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता एस.पी. नागटिळक यांनी दिले. या जोडण्याबद्दल ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)
महावितरणकडून मागेल त्याला वीज जोडणी
आॅनलाईन व्यवहार कायम
सहा महिन्यातील प्रगती समाधानकारक
वीज जोडण्यांचे प्रमाण वाढतेय
वाणिज्य व्यवहारासाठीही वेगळा प्रयोग
महावितरण कडून कामगिरी