शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात ७,९७७ शेतकरी खावटी कर्जमाफीला पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:39 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये सिंधुदुर्गातील खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात ७ हजार ९७७ खावटी कर्जदार या योजनेचा लाभास पात्र ठरले आहेत. त्यातील ७ हजार ७८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. तर कर्ज घेतलेल्या पैकी १०५ मृत किंवा बाहेरगावी, २५ नोकरदार किंवा पेन्शनदार आहेत. तर ५९ प्रकरणे संस्थेकडे प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात ७,९७७ शेतकरी खावटी कर्जमाफीला पात्र७,७८८ अर्ज दाखल : १३० लाभार्थी मयत, बाहेरगावी, नोकरदार

सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये सिंधुदुर्गातील खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी शासनाने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात ७ हजार ९७७ खावटी कर्जदार या योजनेचा लाभास पात्र ठरले आहेत. त्यातील ७ हजार ७८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. तर कर्ज घेतलेल्या पैकी १०५ मृत किंवा बाहेरगावी, २५ नोकरदार किंवा पेन्शनदार आहेत. तर ५९ प्रकरणे संस्थेकडे प्रलंबित आहेत.महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शेतकरी सन्मान योजनेत समावेश करीत खावटी कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८७ संस्थांच्या मार्फत जिल्हा बँकेने ८ हजार ४६३ शेतकऱ्यांना खावटी कर्ज वाटप केल्याने एवढे लाभार्थी या कर्जमापीस पात्र ठरले आहेत. यातील ७ हजार १२८ शेतकऱ्यांनी खावटी कर्जमाफी जाहीर होण्यापूर्वीच कर्जमाफी अर्ज आॅनलाईन सादर केले होते.खावटी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १३३५ शेतकरी अर्ज दाखल करण्याचे शिल्लक होते. १३३५ मधील ८४९ शेतकरी खावटी कर्जमाफीस पात्र ठरले होते. त्यातील ६६० शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. १८९ अर्ज दाखल होण्याचे शिल्लक राहिले आहेत. यातील १०५ मृत किंवा बाहेरगावी तर २५ नोकरदार किंवा पेन्शनर आहेत. ५९ शेतकऱ्यांचे आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.कणकवलीत सर्वाधिक लाभार्थीजिल्ह्यात एकूण खावटी कर्जमाफीस ८ हजार ४६३ पात्र ठरले आहेत. त्यात सर्वाधिक लाभार्थी २५४० एवढे आहेत. देवगड १७१०, मालवण ३८७, वैभववाडी ६९२, कुडाळ ९८७, वेंगुर्ले ६२०, सावंतवाडी १२३६, दोडामार्ग २९१ अशाप्रकारे लाभार्थी आहेत. यात कार्यवाही सुरु असणे किंवा मृत, बाहेरगावी, नोकरदार असल्याने देवगड २४, मालवण ३३, वैभववाडी १९, कणकवली २४, कुडाळ ५१, सावंतवाडी २९, दोडामार्ग ९ असे अर्ज भरणे शिल्लक असून वेंगुर्ले तालुक्यात सर्व अर्ज भरण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग