सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीसाठी मंगळवारी सुमारे ७४.३५ टक्के मतदान झाले. सावंतवाडीत भाजप आणि शिंदेसेनेमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या घटना, मालवणमध्ये सोमवारी रात्री आचारसंहिता भंगाची झालेली तक्रार अशा घटना वगळता मतदान उत्स्फूर्तपणे पार पडले. मालवणमध्ये ७४.०४, वेंगुर्ल्यात ७४.२९, सावंतवाडीत ६९.३६ आणि कणकवलीत विक्रमी ७९.२१ टक्के मतदान झाले.मालवणच्या २१, वेंगुर्ला २१, सावंतवाडी २१ आणि कणकवली १८ अशा एकूण ८१ जागांसाठी तब्बल २८४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होऊन या चारही शहरांचे आगामी पाच वर्षांसाठीचे कारभारी ठरतील.सावंतवाडी पोलिस ठाण्यात भाजप आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमनेसामने येत एकमेकांविरोधात भिडले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आचारसंहिता भंगाचा गुन्हा, रक्कमही सापडलीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप उर्फ बाबा परब यांच्यावर भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम १७१ नुसार मालवण पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसांच्या भरारी पथकाला छापेमारी करताना भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या गाडीत दीड लाखाची रक्कम सापडली. गाडी आणि रक्कम ताब्यात घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. दोन्ही प्रकरणात आमदार नीलेश राणे यांनी सोमवारी रात्री पोलिस ठाणे गाठत भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर आणि यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत.
सावंतवाडीत पैसे वाटपाच्या संशयावरून शिंदेसेना-भाजप भिडलीसावंतवाडीत मतदानाच्या दिवशी सकाळीच पैसे वाटपाच्या संशयावरून शिंदेसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडले. मात्र, पोलिसांनी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टाळला.
Web Summary : Sindhudurg district saw 74.35% voting in local body elections. Sawantwadi witnessed clashes between BJP and Shinde Sena. Malvan reported code of conduct violations. Voting was held peacefully overall. Results will be announced on December 21st.
Web Summary : सिंधुदुर्ग जिले में स्थानीय निकाय चुनावों में 74.35% मतदान हुआ। सावंतवाड़ी में भाजपा और शिंदे सेना के बीच झड़पें हुईं। मालवन में आचार संहिता उल्लंघन की सूचना मिली। मतदान कुल मिलाकर शांतिपूर्ण रहा। परिणाम 21 दिसंबर को घोषित किए जाएंगे।