व्याधीग्रस्त ६६ जणांना मदत

By Admin | Updated: December 25, 2014 00:14 IST2014-12-24T21:28:27+5:302014-12-25T00:14:51+5:30

१५ हजारांचे वाटप : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते वाटप

66 people affected by the disease | व्याधीग्रस्त ६६ जणांना मदत

व्याधीग्रस्त ६६ जणांना मदत

ओरोस : जिल्ह्यातील कॅन्सर, हृदयरोग अशा दुर्धर व्याधींनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांना जिल्हा परिषदेच्या योजनेंतर्गत १५ हजार रुपयांची आर्थिक मदत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते देण्यात आली. यामध्ये एप्रिल ते डिसेंबर
२०१४ या कालावधीत आतापर्यंत
६६ रुग्णांना ही मदत देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते ९ जणांना १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी महादेव मेस्त्री (साळगाव), सीताबाई राऊळ (आंदुर्ले), रविकांत कोचरेकर (परुळे), सावित्री पोकळे (कारिवडे), रवींद्र तोडणकर (मिठमुंबरी), शुभदा परब (हिवाळे), लक्ष्मी मेस्त्री (हेदूळ), रामचंद्र गावडे (मसदे), स्वप्नील गोसावी (कळसुली) या सर्व लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आले. तर घनश्याम मेस्त्री (बांदिवडे) या रुग्णाला हृदयरोग आजारासाठी ९ हजार ३२३ रुपयांचा धनादेश देण्यात आला. शिक्षण व आरोग्य समिती सभापती गुरुनाथ पेडणेकर, वित्त व बांधकाम समिती सभापती संजय बोंबडी, जिल्हा परिषद सदस्य भगवान फाटक, जिल्हा परिषद सदस्या विभावरी खोत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 66 people affected by the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.