जिल्ह्यात दर लाखामागे ५३ कुष्ठरूग्ण

By Admin | Updated: January 30, 2015 23:18 IST2015-01-30T22:45:17+5:302015-01-30T23:18:45+5:30

रत्नागिरी जिल्हा : रोगनिर्मूलनासाठी आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहीम

53 leprosy patients in the district | जिल्ह्यात दर लाखामागे ५३ कुष्ठरूग्ण

जिल्ह्यात दर लाखामागे ५३ कुष्ठरूग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात कुष्ठरूग्णांचे प्रमाण दरहजारी ०.५३ इतके असून, आधीचे एकूण रूग्ण ९० आहेत. लहान मुलांचे प्रमाण ७.४६ टक्के आहे. तसेच नवीन कुष्ठरूग्णांची संख्या ६४ असून, हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे ३.३८ टक्के इतके आहे. एप्रिल २०१४ पासून आतापर्यंत विकृतीचे प्रमाण २.९९ टक्के आहे. जिल्ह्यात या रोगाचे प्रमाण कमी असले तरी पूर्णत: निर्मूलन होण्यासाठी ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची, माहिती आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा कुष्ठरोग सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत तालुका कुष्ठरोग निवारण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या मोहीमेला प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी या विभागाचे सहायक संचालक बी. एस. ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडाळकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके, श्रीकांत कुलकर्णी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. जिल्ह्यात कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी आहे. मात्र, आहे ते प्रमाण दरहजारी एकपेक्षा कमी करणे, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ठोंबरे यांनी दिली.
या मोहिमेसाठी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, मंडणगड, दापोली या चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान १६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष सर्वेक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा, स्वयंसेविका, तसेच बरा झालेला कुष्ठरूग्ण अथवा स्वयंसेवक यांच्या पथकांमार्फत या चार तालुक्यांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. मोहिमेपूर्वी तालुक्यात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच युवावर्ग, युवा मंडळे, बचत गट, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांची विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरदेखील मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत एकही रूग्ण उपचाराविना राहता कामा नये, यासाठी लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. याकरिता छोट्या छोट्या गावांमध्ये जास्तीत जास्त शिबिरे घ्या, जोडीने कुष्ठरोगाबाबत माहिती देणारा निर्मुलनाचा कार्यक्रम आयोजित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी दिल्या. (प्रतिनिधी)

कुष्ठरूग्ण निवारण मोहिमेत, समाजात असलेले कुष्ठरूग्ण स्वत:हून पुढे यावेत. या मोहिमेद्वारे जास्तीत जास्त कुष्ठरूग्ण शोधून काढण्यात येणार आहेत. विकृती प्रतिबंध, वैद्यकीय पुनर्वसनांतर्गत नवीन व जुन्या रूग्णांना सेवा व सल्ला देण्यात येणार आहे. कुष्ठरोगाविषयी समाजात असलेले गैरसमज अथवा भीती दूर करण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे. समाजामध्ये कुष्ठरूग्णांचा सहभाग वाढवण्याचा प्रमुख उद्देश आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण चिपळूण तालुक्यात असून, सर्वात कमी दापोली तालुक्यात आहेत.
जिल्ह्यात या रोगाने ग्रस्त झालेल्या मुलांची एकूण संख्या ४ असून, चिपळूण, दापोली, लांजा आणि मंडणगड येथे प्रत्येकी एक रूग्ण आहे. महिलांची एकूण संख्या २३ आहे. यांपैकी दापोली, गुहागर, मंडणगड येथे प्रत्येकी एक; लांजा, राजापूर येथे प्रत्येकी दोन आणि चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार अशी आहे.


एप्रिल ते डिसेंबर २०१४ अखेर कुष्ठरूग्णांची एकूण संख्या
तालुकाआधीचेनवीनएकूण
मंडणगड०८०७१५
दापोली०५०३०८
खेड१४१२२६
चिपळूण१९११३०
गुहागर०९०६१५
संगमेश्वर०९०७१६
रत्नागिरी१५०८२३
लांजा०५०५१०
राजापूर््०६०५११
एकूण९०६४१५४
आधारक्रमांक नोंदणी, नवीन आधारकार्ड व
पॅन कार्ड सुविधेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या
सद्यस्थितीसंसर्गिकअसंसर्गिक एकूण
रूग्णरूग्ण
उपचाराखालील रूग्ण१२३३११५४
आधीचे रूग्ण७३१७९०
नवीन ५०१४६४
रोगमुक्त५११४६५

Web Title: 53 leprosy patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.