शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ गावांना दरड कोसळण्याचा धोका, आपत्ती विभागाकडून यंत्रणा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:51 IST

आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत सर्वेक्षण ; नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

ओरोस  : मुसळधार किंवा अती मुसळधार पावसाच्या वेळी काही ठिकाणी दरड कोसळते. अशा ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार या ४३ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण रेल्वे मार्ग व राज्य, राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळते, अशी ठिकाणेही प्रशासनाने निश्चित केली आहे.यात सावंतवाडी तालुक्यातील गाळेल इन्सुली, आंबोली, मळेवाड, वेत्ये, कणकवली तालुक्यात रांजणगाव, खुर्द, कुंभवडे, फोडा, वैभववाडी तालुक्यात नाध वडे, करुळ-भट्टीवाडी, दिंडवणेवाडी-धनगरवाडी, वेंगुर्ले तालुक्यात तुळस काजरमळी, तुळस रेवटीवाडी, तुळस वाघोसेवाडी, वायंगणी डोमवाडी, म्हापण, कोचरा, मोचेमाड घाट, तुळस, रामघाट रोड, बडखोल, निवती मेढा, देवगड तालुक्यातील मोर्वे, नारिग्रे, दहिबाव, पाळेकरवाडी, पोयरे, मुणगे, खुडी, कुवळे, तोरसोळे, सादशी, गढीताम्हाणे, कुडाळ तालुक्यातील वालावल, कवठी, नेरुर कर्याद नारुर, घोटगे, दुर्गानगर, भरणी, मालवण, वरचीवाडी, गावठणवाडी, खालची गावडेवाडी, अशा एकूण ४३ गावांचा समावेश आहे. सर्वेक्षणानुसार या गावांत दरड कोसळण्याची शक्यता आहे.राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील दरड प्रवण ठिकाणेदेवगड उपविभाग-विजयदुर्ग, पडेल जामसंडे, कुणकेश्वर आचरा-मालवण-रेवस रेवंडी रस्ता (प्रमुख राज्यमार्ग) देवगड निपाणी रस्ता राक्षस घाटी (राज्यमार्ग) वैभववाडी उपविभाग-गगनबावडा, मुईबावडा खारेपाटण रस्ता भुईबावडा घाट (राज्यमार्ग) पडेल वाघोटण तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता-करुळ घाट (राष्ट्रीय महामार्ग), कणकवली उपविभाग-देवगड निपाणी रस्ता फोंडाघाट पडेल वाघोटन तळेरे रस्ता (राज्यमार्ग) सावंतवाडी उपविभाग वेंगुर्ले-सावंतवाडी-आंबोली बेळगाव-आंबोली घाट (राष्ट्रीय महामार्ग.)कोकण रेल्वे मार्गावरील  दरडग्रस्त ठिकाणेवैभववाडी-लाडवाडी ॲप्रोच कटिंग, गोपालवाडी ॲप्रोच डिप कटिंग, चिंचवली डिप कटिंग, बेर्ले टनेल, वैभववाडी आणि देवगड-नापणे कटिंग, देवगड आणि कणकवली-बेळणा, कणकवली आणि कुडाळ-बोर्डवे कटिंग, सावंतवाडी-नेमळे. सद्यस्थितीत या ठिकाणी दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, अति पाऊस झाल्यास या ठिकाणी दरड पडण्याचा धोका संभवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.यंत्रणा तैनातआपत्कालीन परिस्थितीतील या दरडप्रवण ठिकाणांवर दरड कोसळल्यास ती बाजूला करण्यासाठी लागणारी यंत्रणा आपत्ती विभागाकडून तैनात ठेवण्यात आली आहे. मात्र, तरीही नागरिकांनी या ठिकाणांबाबत सदैव जागृत राहवे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlandslidesभूस्खलनRainपाऊस