शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

स्वयंसहायता समूहांची मुख्यमंत्र्याना ४ लाख पत्रे, सिंधुदुर्गातही नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:42 PM

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ४५ लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये . कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसूबा हानून पाडण्यासाठी राज्यभरातील स्वंयसहायता समुह सुमारे ४ लाख पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे.

ठळक मुद्देस्वयंसहायता समूहांची मुख्यमंत्र्याना ४ लाख पत्रे, सिंधुदुर्गातही नियोजन सुरू४५ लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या उमेद अभियानात बदल करू नये ,अशी मागणी

कणकवली : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ४५ लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये . तसेच चुकीचे आकलन करुन कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसूबा हानून पाडण्यासाठी राज्यभरातील स्वंयसहायता समुह सुमारे ४ लाख पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे. त्याबाबत सिंधुदुर्गातही नियोजन सुरू आहे. अशी माहिती सिंधू संघर्ष कर्मचारी कल्याणकारी मंडळाचे सदस्य शिवाजी खरात यांनी दिली.केंद्रसरकारच्या दारिद्रय निर्मुलन धोरणा अंतर्गत राज्यात राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका कार्यक्रमाची (उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) २०११ पासून यशस्वीपणे अमलबजावणी केली जात आहे. लोकांनी लोकांसाठी लोकसंस्था उभारुन त्यामार्फत सामाजिक समावेशन, वित्तीय समावेशन करुन उपजिविका साधने बळकट करण्याचे यामागे सुत्र आहे.

६०-४० टक्के निधी गुणोत्तराने या अभियानाची अमलबजावणी सुरू असून, जागतिक बॅक व केंद्र सरकारने वेळावेळी केलेल्या मुल्यांकनात संबधित अभियान निश्चित केलेले टप्पे यशस्वीपणे पूर्ण करत असल्याचे आढळून आले आहे. घटनात्मक तरतूदीनुसार ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, भटक्या व विमुक्त प्रवर्ग, अपंग व निराधार या वंचित घटकांत सामाजिक व आर्थिक समानता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य या अभियानातंर्गत सुरू आहे.मागील ९ वर्षात या अभियानात कार्यरत समर्पित आणि क्षेत्रकार्यास वाहून घेतलेल्या कंत्राटी मनुष्यबळामुळे राज्यात ४.७८ लक्ष समूह, २०३११ ग्रामसंघ व ७८९ प्रभागसंघ स्थापन झाले आहे. या लोकसंस्थांच्या माध्यमातून १७.४४ लक्ष कुटूंबासाठी उपजिविकेची साधने निर्माण करण्यात आली आहेत. अभियानात कार्यरत विषयतज्ज्ञांमुळे समुहांना दरवर्षी सुमारे ७२०० कोटीहून अधिक बँक कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे अभियान सर्वांर्थांने सामाजिक उत्थानाचे कार्य करीत आहे.ग्रामस्तरापर्यंत वंचित घटकांची क्षमतावृदधी हा अभियानाचा गाभा असून, त्यासाठी जागतिक बँक, केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार व्यावसायिक मनुष्यिबळाची निवड करण्यात आली असून, मनुष्यबळ विकास मार्गदर्शिकेनुसार अभियानाचे काम सुरू होते.तथापि १० सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अत्यंत अविवेकी निर्णय घेतला असून, मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी पदधतीने कार्यरत कर्मचारी यांना पुर्ननियुक्ती न देण्याचे पत्र जारी केले आहे. हा निर्णय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानवी हक्क डावलणारा तव्दतच एका लोककल्याणकारी अभियान संपविण्याचा घाट आहे

. त्यामुळे स्वंयसहायता समुहांनी थेट मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करुन योग्य निर्णय घेण्यासाठी गळ घालणारी पत्र मातोश्रीवर पाठविण्याचे ठरविले आहे. पुढील दोन दिवसांत पहिला टप्पा म्हणून ४ लाख पत्र पाठविली जाणार आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नियोजन सुरू आहे. 

 

 

 

 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासsindhudurgसिंधुदुर्ग