शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाट तपासणी नाक्यावर कारमध्ये सापडली ३८ लाखाची रोकड, कोल्हापुरातील व्यावसायिकाची असल्याची माहिती

By सुधीर राणे | Updated: June 20, 2024 13:36 IST

कणकवली : फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून बुधवारी रात्री वाहनांची तपासणी सुरू असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका ...

कणकवली : फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून बुधवारी रात्री वाहनांची तपासणी सुरू असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार (क्रमांक एम.एच.०९एफ.बी.४०७८) मध्ये तब्बल ३८लाख ६७ हजार ९०० रुपयांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी विसंगत उत्तरे दिली.दरम्यान, कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाची ही रक्कम असल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहींना माल दिल्यानंतर वसूल केलेली रक्कम घेऊन ते दोघेजण जात होते. चेक द्वारे पेमेंट न करता कॅश पेमेंट घेऊन अशा प्रकारे जीएसटी चुकवण्याचा हा प्रयत्न असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. फोंडघाट तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे पोलिस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईनंतर घटनेची माहिती वरिष्ठांना देताच पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व रवींद्र शेगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्रक्रियेअंती ती रक्कम महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अधिक तपास सुरू आहे.नितीन बनसोडे यांच्यासहित पथकाने काही दिवसांपूर्वीच खारेपाटण तपासणी नाक्यावर विनापरवाना बंदुकी सहित शिकाऱ्यांवर कारवाई केली होती. ही कारवाई चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस