शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुक्यातील ३७५४ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पासून वंचित

By सुधीर राणे | Updated: December 21, 2023 16:49 IST

कणकवली: कणकवली तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी २१ हजार ५५० शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यातील १९ हजार ८९३ एवढ्या ...

कणकवली: कणकवली तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी २१ हजार ५५० शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यातील १९ हजार ८९३ एवढ्या शेतक-यांची ई - आधार लिंक असल्याने त्यांना सन्मान निधी प्राप्त होत आहे. मात्र तालुक्यातील १ हजार ६५७ शेतकऱ्यांचे ई - आधार लिंक प्रलंबित आहे. तसेच २ हजार ९७ शेतकऱ्यांचे आधार सिंडींग , एनपीसीआय मॅपिंग , डीबीटी एनेबल करणे अपूर्ण असल्याने त्याना पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे  कणकवली तालुक्यात ३ हजार ७५४ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पासुन सध्या वंचित आहेत. अशी माहिती कणकवली तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे यांनी दिली.या शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीमधील शेतक-यांच्या त्रुटी दुर करण्यासाठी कृषी विभाग व शेतक-यांना बॅंकांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे २३ व २५ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभांमधून पंतप्रधान किसान सन्मान निधी बाबतच्या त्रुटी सांगून शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कणकवली तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत त्रुटी असलेल्या शेतक-यांच्या याद्या कृषी सहायकांमार्फत ग्रामसहायकांना दिलेल्या आहेत. त्यानुसार कृषी सहायक शेतक-यांच्या त्रुटींची पुर्तता करण्यासाठी गावागावांत जनजागृती करत आहेत. संबंधित त्रुटी काय आहेत? याबाबत शेतक-यांकडे गेल्यानंतर ओटीपी जातो त्यावेळी वयोवृध्द शेतकरी ओटीपी व आधारकार्ड नंबर देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे काही शेतकरी लाभापासुन वंचित राहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना