शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बनावट मनी कंट्रोल अ‍ॅप देत ३३ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 13:18 IST

कणकवली: शेअर्स खरेदी करून तुम्हाला जादा फायदा मिळवून देतो असे सांगत धनादेशाद्वारे शहरातील दोन व्यक्तींकडून पैसे घेतले.मात्र, कोणत्याही प्रकारचे ...

कणकवली: शेअर्स खरेदी करून तुम्हाला जादा फायदा मिळवून देतो असे सांगत धनादेशाद्वारे शहरातील दोन व्यक्तींकडून पैसे घेतले.मात्र, कोणत्याही प्रकारचे शेअर्स खरेदी न करता बनावट मनी कंट्रोल अ‍ॅप डाऊनलोड करून देवून बनावट स्टेटमेंट देत विश्वास संपादन करत डॉ.सुर्यकांत नारायण तायशेटे (७५) आणि त्यांची पत्नी शुभांगी तायशेटे (दोन्ही रा. कणकवली) यांची एकूण ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून  एका महिलेसह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत कणकवली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार  विवेक विजय पार्टे, वेदिका वैभव पार्टे (दोन्ही रा. शिरोडा नाका , सावंतवाडी) आणि प्रथमेश श्रीकांत राणे (रा. इन्सूली,सावंतवाडी) या तीन संशयितांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर  हा फसवणुकीचा गुन्हा १९ जुलै २०२२ ते २७ डिसेंबर २०२३ या दरम्यानच्या कालावधीत  घडला आहे.  संशयितांनी एकमेकांच्या संगनमताने तक्रारदार  सुर्यकांत तायशेटे यांना तुमच्या नावे शेअर्स खरेदी करून तुम्हाला जास्त फायदा मिळवून देतो असे सांगितले. तसेच तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी धनादेशाद्वारे रकमा घेवून कोणत्याही प्रकारचे शेअर्स त्यांच्या नावे खरेदी केले नाहीत. तक्रारदार  यांना बनावट मनी कंट्रोल अ‍ॅप डाऊनलोड करून देवून बनावट स्टेटमेंट देत त्यांचा विश्वास संपादन केला. यामध्ये सुर्यकांत तायशेटे यांची २० लाख १९ हजार ९३४ रुपये आणि पत्नी शुभांगी तायशेटे यांची १२ लाख ७५ हजार रुपये अशी एकूण ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी  सुर्यकांत तायशेटे यांच्या तक्रारीवरून संशयित विवेक पार्टे, वेदिका पार्टे आणि प्रथमेश राणे यांच्याविरुद्ध कणकवली पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस