शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ३० कोटींची थकबाकी 

By सुधीर राणे | Updated: January 2, 2024 12:16 IST

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८७ हजार ६२१ वीज ग्राहकांकडे ३० कोटी ५९ लाख एवढी थकबाकी आहे. ही वीज देयकांची ...

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८७ हजार ६२१ वीज ग्राहकांकडे ३० कोटी ५९ लाख एवढी थकबाकी आहे. ही वीज देयकांची थकबाकी न भरल्यास संबधित ग्राहकांचा  वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे वीज वापरताय तर जरा बिल भरून सहकार्य करा,असे आवाहन वीज वितरणकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील वीज बील थकबाकीमध्ये पथदिपांची ९ कोटी ४२ लाखांची सर्वाधिक थकबाकी आहे. शेती पंप विद्युत पुरवठा होणा-या ग्राहकांकडे ५ कोटी ३४ लाख एवढी थकबाकी आहे. कणकवली विभागातील ४१ हजार १३२ ग्राहकांकडे १५ कोटी २२ लाख तर कुडाळ विभागातील ४६ हजार ४८९ ग्राहकांकडे १५ कोटी ३७ लाख अशी  जिल्ह्यात एकूण  ३०  कोटी ५९ लाखांची थकबाकी आहे. जिल्ह्यात घरगुती  ५८ हजार ४३५ ग्राहकांकडे ७ कोटी १७ लाख , वाणिज्य ५ हजार ३६१ ग्राहकांकडे २ कोटी ५ हजार , औद्योगिक १ हजार ६१ ग्राहकांकडे १ कोटी १३लाख शेतक-यांसाठी शेती पंप विज पुरवठा होत असलेल्या १६ हजार ५८४ ग्राहकांकडे ५ कोटी ३४ लाख , शेतीशी निगडीत २६४ विज ग्राहकांकडे २२ लाख , विविध गावांमध्ये पथदीप विज पुरवठा २ हजार ४८८ ग्राहकांकडे ९ कोटी ४२ लाख , नळपाणी योजना विज पुरवठा १ हजार ३४३ ग्राहकांकडे ४ कोटी ११ लाख , शासकीय व निमशासकीय विज पुरवठा होत असलेल्या २ हजार ८६ग्राहकांकडे १ कोटी १४ लाख एवढी थकबाकी आहे. कणकवली उपविभागात वीज वितरण कंपनीची घरगुती ग्राहक  २७ हजार ३०२ ग्राहकांकडे ३ कोटी १० लाख, वाणिज्य २ हजार १८५ ग्राहकांकडे ८१ लाख, औद्योगिक ४१६ ग्राहकांकडे ६२ लाख, कृषीपंप २ कोटी ५६ लाख, शेती निगडीत ग्राहक १६ लाख , पथदीप योजना ४ कोटी ५० लाख, नळ पाणी पुरवठा योजना २ कोटी ९९ लाख, शासकीय कार्यालये ४९ लाख अशी थकबाकी आहे.  कणकवली उपविभागातील आचरा , देवगड , कणकवली , मालवण , वैभववाडी येथील ४१ हजार १३२ ग्राहकांकडे १५ कोटी २२ लाख रुपये एवढी वीज वितरणची थकबाकी आहे. कुडाळ उपविभागात वीज वितरण कंपनीची ३१ हजार १३३ घरगुती ग्राहकांकडे ४कोटी ८लाख, वाणिज्य ३ हजार १७६ ग्राहकांकडे १ कोटी २४ लाख, औद्योगिक ६४५ ग्राहकांकडे ५१ लाख, कृषीपंप २ कोटी ७९ लाख, शेती निगडीत ग्राहक ६ लाख , पथदीप  योजना ४ कोटी ९३ लाख, नळपाणी पुरवठा योजना १ कोटी १२ लाख, शासकीय कार्यालये ६५ लाख अशी थकबाकी आहे. कुडाळ उपविभागातील कुडाळ , ओरोस , सांवतवाडी , दोडामार्ग , वेंगुर्लो येथील ४६ हजार ४८९ ग्राहकांकडे १५ कोटी ३७ लाख रुपये एवढी वीज वितरणची थकबाकी आहे. 

ग्राहकांनी  सहकार्य करावे!विज ग्राहकांना चांगली सेवा देण्याबाबत अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करत असतात. आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. त्यामुळे ग्राहकांनी आपला विद्युत पुरवठा खंडीत होण्याची कारवाई टाळण्यासाठी विज बिले भरुन सहकार्य करावे. - बाळासाहेब मोहिते,कार्यकरी अभियंता,कणकवली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजmahavitaranमहावितरण