लोकमत न्यूज नेटवर्कबोर्ली-मांडला : मुरूड समुद्रकिनारी ३ फुटी डॉल्फिन मृतावस्थेत आढळला. दुपारच्या सुमारास घोडागाडी चालवणारे विनोद आंबूकर यांना हा मासा मृतावस्थेत दिसला. त्यांनी या माशाचे फोटो काढून वनखाते व नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली. समुद्रातील वाढते प्रदूषण हे समुद्री जीवांच्या जिवावर बेतत आहेत. दरवर्षी कित्येक डॉल्फिन व कासव समुद्रकिनारी मृतावस्थेत सापडतात. मात्र, तरीदेखील या समुद्री जीवांचे संवर्धन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
मुरूडच्या समुद्रकिनारी आढळला ३ फुटी डॉल्फिन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 09:18 IST