२९३ ग्रामसेवकांचा पगार कापणार
By Admin | Updated: July 24, 2014 21:53 IST2014-07-24T21:53:30+5:302014-07-24T21:53:58+5:30
काम बंद तर पगार बंद असे धोरण सरकारचे

२९३ ग्रामसेवकांचा पगार कापणार
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपावर गेलेल्या ग्रामसेवकांचा १५ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतला आहे. यामुळे सिंधुदुर्गातील २९३ ग्रामसेवकांचा १५ दिवसाचा पगार कापण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली.ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून संप पुकारला होता. काम बंद तर पगार बंद असे धोरण सरकारचे आहे. या धोरणानुसार संपावरील सर्व ग्रामसेवकांचा पगार कापण्यात येणार आहे. ग्रामसेवक संघटनेने आपल्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी मुंबईतही आंदोलन केले होते. १५ जुलैला कामावर हजर राहण्याची नोटीस ग्रामविकास खात्याने ग्रामसेवकांना बजावली होती. या नोटीसा धुडकावून ग्रामसेवकांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते.पंचायतराज समिती १७ ते १९ जुलैपर्यंत आंदोलकांनी आंदोलन मागे घेत १७ जुलैपासून जिल्ह्यातील सर्व २९३ ग्रामसेवक कामावर हजर झाले होते. जूनमध्ये डॉक्टरांचेही आंदोलन चिरडण्यात आले होते. पुन्हा ग्रामसेवकांनी आंदोलन पुकारले तेही आंदोलन सरकारने चिरडले. (वार्ताहर)