सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. २१ रोजी) चारही पालिकांसाठीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या एकुण ८१ जागांसाठी २८४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यात नगराध्यक्षपदासाठी १८ तर नगरसेवक पदासाठी २६६ जण आपले नशीब अजमावणार आहेत.मालवण नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी ६ (भाजप, उद्धवसेना आणि शिंदेसेना) आणि २० नगरसेवक पदासाठी ६१, वेंगुर्ला पालिकेत नगराध्यक्षपदासाठी ६ (भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस आणि अपक्ष २) आणि २० नगरसेवक पदासाठी ८३. सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ६ (भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, अपक्ष २) आणि २० नगरसेवक पदासाठी ८६ जण रिंगणात आहेत. तर कणकवली नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठी ३ (भाजप, शहरविकास आघाडी आणि अपक्ष) तर नगरसेवकपदांच्या १७ जागांसाठी ३६ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत.कणकवलीत भाजपाविरोधात सर्वपक्ष एकवटलेमालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तिन्ही पालिकांमध्ये सर्व पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात आहेत. तर केवळ कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपाविरोधात इतर सर्व पक्ष एकवटून बनविलेल्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे याठिकाणी चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.
Web Summary : Sindhudurg's Malvan, Vengurla, Sawantwadi, and Kankavli will vote on December 2nd. 284 candidates vie for 81 seats. Kankavli sees a united opposition front against the BJP, promising a fierce contest, unlike other areas.
Web Summary : सिंधुदुर्ग के मालवण, वेंगुरला, सावंतवाड़ी और कणकवली में 2 दिसंबर को मतदान होगा। 81 सीटों के लिए 284 उम्मीदवार प्रतिस्पर्धा कर रहे हैं। कणकवली में भाजपा के खिलाफ एकजुट विपक्ष है, जिससे कड़ी टक्कर की उम्मीद है।