सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सोमवारी (दि.१७ ) एकुण नगरसेवकपदाच्या ७७ जागांसाठी एकुण ३७३ तर नगराध्यक्षपदाच्या ४ जागांसाठी एकुण २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता मंगळवार (दि.१८) रोजी छाननी होणार आहे.मालवण नगरपरिषदेत नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ७६ तर नगराध्यक्षपदासाठी ६ अर्ज, वेंगुर्ल्यात नगरसेवक पदासाठी ११३ आणि नगराध्यक्षपदासाठी ८, सावंतवाडीत नगरसेवक पदासाठी १२८ आणि नगराध्यक्षपदासाठी ८ आणि कणकवली नगरपंचायतीत १७ नगरसेवक पदासाठी ५६ आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ असे अर्ज दाखल झाले आहेत.
कणकवलीत शहर विकास आघाडीचा झाला क्रांतीकारी विचार पक्षकणकवलीत शहर विकास आघाडीच्यावतीने माजी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि इतर १७ जणांनी क्रांतीकारी विचार पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात उद्धवसेना, शिंदेसेना, काँग्रेस हे सर्वच पक्ष आपापले उमेदवार असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे भाजपा विरोधात क्रांतीकारी पक्ष अशीचा प्रमुख लढाई होणार आहे.
Web Summary : Sindhudurg district sees 373 applications for 77 councilor seats and 26 for president across Malvan, Vengurla, Sawantwadi, and Kankavli. Scrutiny is scheduled for Tuesday. Kankavli witnesses a 'Revolutionary Thought Party' challenge.
Web Summary : सिंधुदुर्ग जिले में मालवण, वेंगुर्ला, सावंतवाड़ी और कणकवली में 77 पार्षद सीटों के लिए 373 और अध्यक्ष पद के लिए 26 आवेदन आए। मंगलवार को जांच होगी। कणकवली में 'क्रांतिकारी विचार पार्टी' की चुनौती।