शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

२२ लाखांचे स्पिरीट जप्त, कर्नाटकमधील दोघांना अटक, बांदा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 21:48 IST

तेलंगणा येथून गोव्याच्या दिशेने विनापरवाना स्पिरीटची वाहतूक करणा-या टँकरवर बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा पोलिस तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ५0 हजार रुपये किमतीच्या स्पिरीटसह एकूण ३0 लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

बांदा - तेलंगणा येथून गोव्याच्या दिशेने विनापरवाना स्पिरीटची वाहतूक करणा-या टँकरवर बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा पोलिस तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ५0 हजार रुपये किमतीच्या स्पिरीटसह एकूण ३0 लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टँकरचालक विलास कृष्णाजी घाटगे (२४, रा. विजापूर-कर्नाटक) व परशुराम हनुमंतराव खुंटोजी (३0, रा. कर्नाटक) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. बांदा पोलिसांची स्पिरीट वाहतुकीविरोधातील ही अलिकडच्या काळातील दुसरी मोठी कारवाई आहे.याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री उशिरा तपासणी नाक्यावर  वाहनांची तपासणी सुरु असताना गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर (के ए २८ सी १८४९) तपासणीसाठी थांबविण्यात आला. बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जयदिप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विठोबा सावंत, शहाजी बुरुड, हेमंत पेडणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. संदिग्ध उत्तरांनी संशय बळावलासोमवारी रात्री उशिरा गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर तपासणी नाक्यावर थांंबविण्यात आला. पोलिसांनी चालकाकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने संदिग्ध उत्तरे दिली. संशय आल्याने पोलिसांनी टँकरची तपासणी केली असता पाठीमागील टाकीत २२ लाख ५0 हजार रुपये किमतीचे बेकायदा स्पिरीट आढळले. पोलिसांनी स्पिरीट व ८ लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण ३0 लाख ५0 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जयदिप कळेकर करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग