शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली १७ शाळाबाह्य मुले, शिक्षण विभागाकडून राबविण्यात आली विशेष शोधमोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:30 IST

सर्वांना शालेय प्रवाहात आणले जाणार

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या विशेष शोधमोहिमेत एकूण १७ शाळाबाह्य मुलांचा शोध लागला आहे. १ जुलैपासून हाती घेण्यात आलेली ही मोहीम १५ जुलैपर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला असून, जिल्हाभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत १७ मुले शाळाबाह्य आढळली आहेत.यामध्ये ११ मुले, तर ६ मुलींचा समावेश आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतियुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल शाळा, आयएसओ मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी, नवोदय परीक्षा तयारी, अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे.मात्र, सरकारच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शोधमोहीम राबविण्यात आली.मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, कारखाने, स्थलांतरित कुटुंब, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षणगृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यात आल्या.शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोध मोहिमेंतर्गत ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे हा प्रमुख उद्देश आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात १, कुडाळ तालुक्यात १०, तर वेंगुर्ला तालुक्यात ६ मुले शाळाबाह्य मुलांचा समावेश आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.गेल्या वर्षी ६ मुले आढळली होतीगेल्या वर्षी ५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेत ६ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. त्यांना शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले होते.