शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

१५ वित्त आयोगाच्या निधीबाबत सरपंचांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 17:36 IST

Zp NiteshRane Sindhudurg : शासनाने सरपंचांची कोविड काळात विमा पॉलिसी उतरविण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याची पूर्तता झालेली नाही. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सरपंचांच्या विमा पॉलिसी उतरविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. याबद्दल कणकवली तालुक्यातील सरपंचांच्यावतीने आमदार नितेश राणे व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांचे आभार मानण्यात आले.

ठळक मुद्दे१५ वित्त आयोगाच्या निधीबाबत सरपंचांची बैठकआमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांचे मानले आभार

कणकवली : शासनाने सरपंचांची कोविड काळात विमा पॉलिसी उतरविण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याची पूर्तता झालेली नाही. मात्र, सिंधुदुर्गजिल्हा परिषद व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सरपंचांच्या विमा पॉलिसी उतरविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. याबद्दल कणकवली तालुक्यातील सरपंचांच्यावतीने आमदार नितेश राणे व सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांचे आभार मानण्यात आले.कणकवली पंचायत समितीमध्ये तालुक्यातील सरपंचांची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरपंचांच्या अनेक समस्यांबाबत एकत्रित चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत शासनाकडून येणाऱ्या सूचना व गाव विकासाला कमी पडणारा निधी यासंदर्भात सरपंचांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

यात प्रामुख्याने डाटा ऑपरेटरचे दीड लाख रुपये तातडीने जमा करा, असे आदेश शासनाकडून देण्यात आले. तसेच गावांमधील पथदिव्यांचे बिल, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून तातडीने भरा, असाही आदेश शासनाकडून देण्यात आला. हे आदेश ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचलेही नाहीत. मात्र, महावितरणचे अधिकारी वसुलीसाठी ग्रामपंचायतींकडे तगादा लावत आहेत. मात्र, १५ व्या वित्त आयोगांतर्गत आराखड्यातून ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार विकासकामे व्हावीत व हे पैसे अन्यत्र खर्च करण्यात येऊ नयेत, असे सरपंचांचे ठाम मत असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा वाघेरी सरपंच संतोष राणे यांनी दिली.शासनाने आदेश दिल्याप्रमाणे डाटा ऑपरेटरचे दीड लाख रुपये ग्रामपंचायतीने भरणा करायचे नाहीत, असा ठाम निर्णय या सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राणे यांनी दिली. या बैठकीला ओटव सरपंच हेमंत परुळेकर, पिसेकमते सरपंच सुहास राणे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, करंजे सरपंच मंगेश तळगावकर, नरडवे सरपंच अस्मिता सावंत, कळसुली सरपंच साक्षी परब, साकेडी सरपंच रिना राणे यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग