शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 08:53 IST

सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल १२९ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मात्र काहींची प्रकृती थोडी गंभीर असल्याने त्यांना सावंतवाडी व कुडाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांना जुलाब व उलटी झाल्यानंतर उघडकीस आला असून सध्या मुलांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात ४०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्वच विद्यार्थी निवासी असून त्यांना विद्यालयातील मेस मधून जेवण दिले जाते. तसे या विद्यार्थ्यांनी गुरूवारी रात्रीच्या सुमारास जेवण देण्यात आले होते.

सर्वच मुले निवासी, पालकांनी दिली माहितीसर्वच मुले  निवासी असल्याने त्याचे आई-वडील गावी असतात. त्यांना ही माहिती देण्यात आली आहे. तसेच विद्यालयाचे शिक्षक ही विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेत आहेत. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांत पाचवीपासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांसह वैद्यकीय पथक दाखलदरम्यान या घटनेची दखल घेऊन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक हे सांगेली येथील आरोग्य केंद्रात पाठवले. यात  यात जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सई धुरी, वर्षा शिरोडकर, गौरी तानवडे,  डॉ. मिलिंद खानोलकर यांचा समावेश आहे.ते विद्यार्थ्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

जेवणातील पदार्थ बदलला विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणात नेहमीची बटाट्याची भाजी नव्हती. वेगळी मसाला बटाटा भाजी होती. तसेच जिरा भात होता असे विद्यार्थी सांगत होते. किचनमध्ये ही ठेवण्यात आलेल्या भाज्या या खराब झाल्या होत्या. चपाती ही योग्य नव्हती असा आरोप पालकांनी केला आहे.

सध्यातरी जेवणातून घडला प्रकार - घटनेनंतर सांगेली येथील आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार जेवणातून घडल्याचे मान्य केले. तसेच हा प्रकार जेवणातून विषबाधा आहे. असे ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र जेवण तपासणीनंतर खरे कारण स्पष्ट होणार आहे.

- घटनेनंतर विद्यार्थ्याचे पालक शाळेत दाखल झाले  असून सायंकाळी उशिरा पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगेली येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस ही केली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाfood poisoningअन्नातून विषबाधाhospitalहॉस्पिटल