बीड: माजलगाव नगराध्यक्षपदी 'तुतारी' विजयी; आमदार सोळंकेंचा उमेदवार तिसऱ्या स्थानी
माजलगाव नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी (शरद पवार) च्या महरीन चाऊस विजयी; आमदार सोळंकेंच्या उमेदवाराचा पराभव. अंतर्गत कलह आणि निकृष्ट विकासामुळे मतदारांनी अनेक प्रमुख उमेदवारांचा पराभव केला. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये एकीचे प्रदर्शन दिसून आल्याने जोरदार मुसंडी मारली.
मुंबई: जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या: नैराश्याने उचलले टोकाचे पाऊल
मुंबईतील जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टरने वसतिगृहात आत्महत्या केली. अभयसिंह मोरे नैराश्याने त्रस्त होते आणि त्यांनी गळफास घेतला. त्यांच्यावर मानसोपचार सुरू होते. या घटनेने डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस तपास करत आहेत.
हिंगोली: वसमतमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिक भयभीत होऊन घराबाहेर.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला, त्यामुळे नागरिक भयभीत झाले. एप्रिल आणि मे महिन्यात अनेक धक्के बसल्याने चिंतेचे वातावरण आहे. पांगरा शिंदेसह परिसरातील गावांना हादरा बसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. तपासणीची मागणी.
छत्रपती संभाजीनगर: थँक यू सिस्टर! दोन शब्द मोठा पुरस्कार, जीवनाची उमेद.
परिचारिका रुग्णांची अविरत सेवा करतात, त्यांना बरे करताना आनंद मिळवतात. रुग्णालयाचा श्वास असलेल्या या परिचारिका समर्पितपणे रुग्णांची काळजी घेतात. नर्स दिनी त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. रुग्णांची कृतज्ञता हाच त्यांचा मोठा सन्मान असतो.
छत्रपती संभाजीनगर: लेकराच्या आशेने माऊली; मुलाने सोडले, पत्ताही खोटा.
वृद्धाश्रमात अंथरुणाला खिळलेली आई मुलाची वाट पाहत आहे. प्रकृती खालावल्याने मुलाने तिला सोडून दिले, पत्ताही खोटा दिला. वृद्धाश्रमाने मुलाला आईची कागदपत्रे जमा करण्याची विनंती केली आहे.
व्यापार: पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार?
इंधनसाठा पुरेसा असला तरी भविष्यात इंधनाचेदर वाढू शकतात. असे संकेत केंद्रिय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले आहे. दरम्यान, तेल कंपन्यांना मोठा तोटा होत आहे. मात्र तो सहन करण्याचीही त्यांची क्षमता आहे. यामुळे भविष्यात तेलाच्या किंती वाढू शकतात, असे पुरी यांनी म्हटले आहे.
पुणे: इंदापुरात ‘कासवबाबा’चे जाळे? राजकीय इच्छुकांकडून कृपादृष्टीची धाव.
फसवणूक प्रकरणी अटकेतील 'कासवबाबा'चे इंदापुरात मोठे जाळे असल्याचा संशय. राजकीय नेते व इतरांनी आशीर्वाद मिळवण्यासाठी धाव घेतली, जिवंत व कृत्रिम कासवे खरेदी केल्याचा आरोप. पोलिस तपासामुळे एजंट व भक्तांचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता.
छत्रपती संभाजीनगर: मोबाइल फोटोवर पीयूसी: संभाजीनगरात धक्कादायक प्रकार उघड
संभाजीनगर: वाहनांची तपासणी न करता केवळ फोटो पाठवून पीयूसी प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणला. यामुळे प्रदूषण वाढण्याचा धोका असून नियमांचे उल्लंघन होत आहे.
व्यापार: इंदिरा गांधींचे सोने खरेदी न करण्याचे आवाहन: व्हायरल बातमीतील सत्य
इंदिरा गांधींनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्याचे 'द हिंदू'मधील १९६७ चे एक कात्रण व्हायरल होत आहे. हे कात्रण बनावट असले तरी, भारताच्या आर्थिक संकटामुळे केलेले आवाहन खरे होते. यापूर्वीही असे आवाहन झाले, ज्यामुळे सध्याच्या आर्थिक चिंतेत राजकीय वाद निर्माण झाला आहे, तरी भारताचा साठा आता मजबूत आहे.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट
मराठवाड्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा वाढत्या तापमानामुळे आणि वापरामुळे एका आठवड्यात २०० दलघमीने घटला. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने जलसंधारण महत्त्वाचे आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची गरज लक्षात घेता धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे.
व्यापार: इन्फ्रा कंपन्यांना लॉटरी! मोठे प्रोजेक्ट मिळाल्यानं शेअर्स सुस्साट
मंगळवारी शेअर बाजारात 'अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर' आणि 'एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग' या दोन दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सनी जोरदार कामगिरी केली. या दोन्ही कंपन्यांना मिळून ११,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे मोठे प्रकल्प मिळाल्यानं गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.
छत्रपती संभाजीनगर: युद्धाच्या तणावात 'शांती'चा शोध: इस्रायली दूतांकडून भारतीय स्थळांना भेट
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायली राजदूत यानिव रेवाच यांनी वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला आणि बीबी का मकबराला भेट दिली. भारतीय संस्कृतीचा स्वीकार करत त्यांनी घृष्णेश्वर मंदिरात प्रार्थना केली आणि प्राचीन कला व वास्तुकलेबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
व्यापार: 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'एबॉट इंडिया' सध्या गुंतवणूकदारांमध्ये चर्चेत आहे. कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सोमवारी झालेल्या बोर्ड बैठकीत कंपनीनं प्रति शेअर ६५६ रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये ५२५ रुपये अंतिम लाभांश आणि १३१ रुपये विशेष लाभांश यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर: भरदिवसा तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेला लुटले, ९ तोळे सोनं लंपास!
पोलिस असल्याची बतावणी करत तोतयांनी कॉलेजजवळ एका वृद्ध महिलेचे नऊ तोळे सोने चोरले. दागिने पिशवीत ठेवण्यास सांगून, ती बदलून चोरटे पळून गेले. पोलिस तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू आहे.
शिक्षण: पेपरफुटीमुळे नीट २०२६ परीक्षा रद्द; सीबीआय चौकशीचे आदेश
नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आहेत.
छत्रपती संभाजीनगर: निदा खानला आश्रय: MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तेची चौकशी
निदा खानला आश्रय देणाऱ्या MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू. अनधिकृत बांधकामांसाठी नोटीस जारी, पटेल यांनी मालकीची कागदपत्रे सादर केली नाहीत. मालमत्तेची मालकी तपासली जाईल, मुदत संपल्यावर कारवाई.
छत्रपती संभाजीनगर: टोयोटाचा मराठवाड्यात धमाका: १ लाख गाड्या दरवर्षी, उत्पादन २०२९ मध्ये
टोयोटा मराठवाड्यातील बिडकीन DMIC मध्ये दरवर्षी १ लाख इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन २०२९ पासून सुरू करणार आहे. २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, २,८०० रोजगारांची निर्मिती होणार, ज्यामुळे स्थानिक उद्योग आणि निर्यातीला चालना मिळेल. प्लांटमध्ये आधुनिक उत्पादन सुविधा असतील.
ठाणे: हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
एका पित्याच्या आयुष्यात सर्वांत सुखाचा क्षण म्हणजे मुलीला आयुष्यभरासाठी चांगला साथीदार शोधून देऊन तिची आनंदाश्रूने पाठवणी करणे. मात्र, शनिवारी रात्री उत्साहात मुलीला हळद लावणाऱ्या पित्याचा दुसऱ्या दिवशी लग्नात अक्षता टाकण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली मोखाडा तालुक्यात घडली.
व्यापार: पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, पाहा नवी किंमत
देशांतर्गत कमोडिटी बाजार म्हणजेच एमसीएक्स (MCX) वर मंगळवार, १२ मे २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५४,१७२ रुपयांवर पोहोचला असून, चांदीनं प्रति किलो २,८२,५५९ रुपयांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, कालच सरकारी सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती की सरकार सोने-चांदीच्या आयातीवर कोणतंही नवीन शुल्क लावण्याच्या विचारात नाही
पुणे: पुणे: सॉफ्टवेअर अभियंत्याची खेळण्यातील नोटा देऊन २१ लाखांची फसवणूक.
पुण्यात विवाहविषयक संकेतस्थळावरुन ओळख झालेल्या एका व्यक्तीने सॉफ्टवेअर अभियंत्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक केली. त्या बदल्यात खेळण्यातील नोटा दिल्या.
महाराष्ट्र: तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेला का?: राज ठाकरेंचा मोदींना सवाल
मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंनी टीका केली. तुमच्या चुकांची शिक्षा जनता का भोगेल? त्यांनी आर्थिक धोरणे व खर्चात पारदर्शकता आणावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
व्यापार: रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आजवरच्या नीचांकी स्तरावर
भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचं नाव घेत नसून मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ३५ पैशांनी कमकुवत झाला. यामुळे रुपया आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी म्हणजेच ९५.६३ या स्तरावर पोहोचला आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव आणि उभय देशांमधील कराराची शक्यता धूसर झाल्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला असून, त्याचा थेट फटका भारतीय चलनाला बसला आहे.
व्यापार: शेअर बाजारात दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका
मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात पुन्हा एकदा घसरणीसह झाली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'सेंसेक्स' ३२६.८९ अंकांनी (०.४३%) कोसळून ७५,६८८.३९ वर उघडला. तर दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा 'निफ्टी ५०' निर्देशांक ९३.२५ अंकांच्या (०.३९%) घसरणीसह २३,७२२.६० वर उघडला.
राष्ट्रीय: अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; नवे मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अण्णाद्रमुक पक्षात फूट पडली असून, मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्यावरून आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षाचे अध्यक्ष ए. के. पलानीस्वामी यांच्या विरोधात बंड होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेतही हे आमदार दोन गटात विभागून बसल्याचे दिसत होते.
आंतरराष्ट्रीय: शास्त्रज्ञांनी १३०० हून अधिक कर्करोग रुग्णांचे आरोग्य तपासले, तेव्हा असे आढळून आले की, जे रुग्ण अन्य कारणासाठी टेस्टोस्टेरॉन किंवा सप्लिमेंट घेत होते, ते इतर रुग्णांच्या तुलनेत जास्त काळ जिवंत राहिले.
टेस्टोस्टेरॉन हार्मोन कर्करोगाविरुद्ध, ब्रेन ट्यूमरविरुद्ध लढण्यास शरीरास मदत करतो. त्याच्या वाढीला रोखण्याची या हार्मोनमध्ये क्षमता आहे, असा निष्कर्ष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका नव्या संशोधनात मांडला आहे. या हार्मोनची कमतरता झाल्यास शरीराची संरक्षण प्रणाली कमकुवत होते आणि ट्यूमरला वाढू शकतो, असे त्यात म्हटले आहे.
व्यापार: जागतिक इंधन संकट : वाढत्या खर्चातही भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
सध्या संपूर्ण जग इराण युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे होरपळून निघत आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्यानं जगभरातील देश इंधनाच्या टंचाईनं आणि महागाईनं त्रस्त आहेत. मात्र, या जागतिक संकटाच्या काळातही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आंतरराष्ट्रीय: युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला
वॉशिंग्टन : अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी इराणने दिलेला प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे अमान्य असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे. त्यामुळे युद्ध पुन्हा पेटू शकते. या घडामोडीमुळे जगाची चिंता वाढली आहे.
ठाणे: इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू
सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या इर्शाळवाडी ट्रेकने सोमवारी एका तरुणाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. ट्रेकिंगसाठी मित्रांसोबत आलेल्या डोंबिवलीतील २० वर्षीय रितेश कोणका या युवकाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला.
मुंबई: संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांनी वर्षभर सोन्याची खरेदी पुढे ढकलावी, असे आवाहन केल्यानंतर रत्न आणि दागिने उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी कॉन्सिल (जीजेसी) ने सोमवारी म्हटले. अंदाजानुसार, देशातील ज्वेलरी उद्योगाची वार्षिक उलाढाल जवळपास १० लाख कोटी रुपये आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर या उलाढालीत थेट ३० टक्के म्हणजेच सुमारे ३ लाख कोटी रुपयांची घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
क्रिकेट: PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
पंजाब किंग्सविरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत कर्णधार अक्षर पटेलसह किलर मिलरची अर्धशतकी खेळी आणि माधव तिवारीची अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने दमदार विजय नोंदवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्यच्या अर्धशतकाच्या जोरावर धरमशालाच्या मैदानात पंजाबच्या संघाने निर्धारित २० षटकात २१० धावा करत दिल्लीसमोर २११ धावांचे आव्हान ठेवले होते. या विजयासह दिल्लीनं प्लेऑफ्सची आस कायम ठेवली. दुसरीकडे पराभवामुळे पंजाबच्या संघाने नंबर वन होण्याची संधी गमावली.
क्रिकेट: विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
ज्या जर्मन मॉडेलवर किंग कोहली फिदा झाल्याची चर्चा रंगली त्या लिजलैज (LizLaz) हिने भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली याच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. विराट कोहलीविरोधात नकारात्मक वक्तव्य करण्यासह खोटे आरोप करण्यासाठी काही माध्यमांकडून मोठ्या पैशांची ऑफर मिळाल्याचा दावा तिने केला आहे.