(Image Credit : Indy100)

तुम्हाला जर विचारलं गेलं की शारीरिक संबंध ठेवण्याची सर्वात चांगली वेळ कोणती तर सर्वसामान्यपणे जास्तीत जास्त लोक रात्रीची हेच उत्तर देतील. कारण असा एक धोबळ मानाने समज आहे की, शारीरिक संबंध हे रात्री झोपतानाच ठेवावे आणि जास्तीत जास्त लोक हेच फॉलो करतात. पण तज्ज्ञांचं यावरील मत वेगळं आहे. तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंध ठेवण्याची सर्वात चांगली वेळ ही पहाटेची आहे. 

(Image Credit : The Hans India)

वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, पहाटेच्या वेळी शारीरिक संबंध ठेवणे सर्वात चांगलं ठरतं. तसेच याचे अनेक फायदेही होतात. सामान्यपणे शारीरिक संबंधाचा पूर्ण आनंद तेव्हाच घेतला जाऊ शकतो, जेव्हा दोन्ही पार्टनर पूर्णपणे रिलॅक्स्ड असतील. 

काय सांगतात तज्ज्ञ?

यावर आम्ही प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ.राजन भोसले यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, 'दिवसभरातील थकव्यानंतर रात्री शारीरिक संबंधाबाबत विचार करणं जरा कठिण होतं. कारण शारीरिक संबंधासाठी ऊर्जा लागते, उत्साह लागतो. पण दिवसभर काम केल्याने आलेला थकवा रात्री तुम्हाला शारीरिक संबंधाचा आनंद मिळवून देऊ शकत नाही. 

You should know that partners special day, When they are the most desires of sex | लैंगिक जीवन :

का पहाटेची वेळ चांगली?

डॉ. भोसले यांनी सांगितले की, 'रात्रीऐवजी पहाटेची वेळ शारीरिक संबंधासाठी सर्वात चांगली असते. रात्री दिवसभराच्या थकव्यानंतर शरीराला आरामाची गरज असते. तर पहाटे शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेलं असतं. शरीरातील थकवा निघून गेलेला असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक संबंधासाठी महत्त्वाचे असलेले हार्मोन टेस्टोस्टेरॉनचं प्रमाणही पुरूष आणि स्त्रियांमध्ये अधिक वाढलेलं असतं. त्यामुळे दोघांनाही यावेळी शारीरिक संबंध ठेवल्याने इतरवेळेपेक्षा जास्त आनंद मिळतो. 

Sexual life: Women body may changes like that during sex | लैंगिक जीवन : उत्तेजित झाल्यावर महिलांच्या शरीरात होतात

होतात हे फायदे...

तसेच एका रिसर्चनुसार, शारीरिक संबंधावेळी शरीरात ऑक्सिटॉसिन हार्मोन रिलीज होता. याने तुमचा मूडही चांगला राहतो. तसेच या हार्मोनमुळे पार्टनरची तुमची जवळीकताही वाढते. त्यासोबतच शारीरिक संबंध ठेवण्याची प्रक्रिया ही एखाद्या एक्सरसाइजसारखीच असते. त्यामुळे सकाळी व्यायाम स्कीप करून तुम्ही शारीरिक संबंधाला प्राधान्य देऊ शकता. एका रिपोर्टनुसार, एकदा ठेवलेल्या शारीरिक संबंधातून ३०० कॅलरी बर्न होतात. 


Web Title: Why morning sex is better than night
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.