(Image Credit : UpVee)
शारीरिक संबंधावेळी महिलांना कडलिंग केलेलं अधिक का आवडतं? एकीकडे पुरूषांचं सांगायचं तर ते इंटरकोर्सला महत्त्व देतात. तर दुसरीकडे महिलांना जास्त वेळ कडलिंग करण्यात अधिक आनंद मिळतो. त्यांना प्रेमाच्या जाणीवेसोबतच असं केल्याने चांगलं वाटतं. पण याचं कारण काय आहे?
boldsky.com ने दिलेल्या वृत्तानुसार, व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक क्रिया किंवा त्याच्या उद्देशामागे काही ना काही साइन्टिफिक कारण असतं. आपण ते कार्य करण्यासाठी आतुर असतो, जे केल्याने आनंद मिळतो आणि या सुखाची अनुभव तेव्हा मिळतो जेव्हा मेंदूत काही हार्मोन्सचा स्त्राव होतो.
वैज्ञानिक कारणांना जर काही वेळासाठी आपण बाजूला ठेवलं तर दुसरी अनेक रोमॅंटिक कारणे आहेत. ज्यामुळे महिलांना कडलिंग करायला अधिक आवडतं. काही वेळासाठी केलेलं कडलिंग तुमच्या नात्याला दुप्पट चांगलं आणि मजबूत करू शकते. रिलेशनशिपच्या लांब प्रवासात छोटे आणि प्रेमाने भरलेले क्षण तुम्हा दोघांच्या नात्याला मजबूती देतात. या लेखाच्या माध्यमातून महिलांना कडलिंग का अधिक आवडतं हे जाणून घेऊया....
प्रेमाची जाणीव
कडलिंगदरम्यान तुमची पार्टनर तुमच्या प्रेमाला आणि काळजीला अधिक समजू शकते. त्या गोष्टी त्यांना अधिक जाणवतात. दोन्ही शरीराच्या स्पर्शाने निघणाऱ्या उष्णतेमुळेही त्यांना चांगलं वाटत असतं. ही प्रेमाची उब त्यांना सहजता प्रदान करते.
स्वत: आकर्षक असण्याची जाणिव
कोणत्याही महिलेला तेव्हा चांगलंच वाटत असतं जेव्हा त्यांना वाटतं त्या फार आकर्षक वाटत आहेत आणि कडलिंगमुळे त्यांना तशी जाणिव होते. जेव्हा तुम्ही एका पॅशनने त्यांना बाहुपाशात घेता तेव्हा त्यांना त्यांच्या सुंदरतेचा गर्व वाटतो.
ऑक्सिटोसिन हार्मोन्स होतात रिलीज
हे एक वैज्ञानिक कारण असतं. जेव्हा महिलांना कडल केलं जातं, तेव्हा त्यांना फार चांगलं वाटतं. यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये फील-गुड हार्मोन्स म्हणजेच ऑक्सिटोसिन हार्मोन्स रिलीज होतात.
सुरक्षिततेची जाणिव
तुमच्या कडलिंग करण्याने तुमच्या पार्टनरमध्ये एक सुरक्षित भावना निर्माण होते. हा तो क्षण असतो जेव्हा मनात उठणाऱ्या भीतीला एका बाजूला सारून त्या क्षणाला त्या सोबत असतात.
इंटरकोर्सनंतर
सामान्यपणे इंटरकोर्सनंतर पुरूष झोपतात, पण असं करणं महिलांना अजिबात पसंत नसतं. इंटरकोर्सनंतर जर पुरूषांनी पार्टनरसोबत कडलिंग केलं तर त्यांना फार आवडतं.
तणावापासून मुक्तता
कडलिंगदरम्यान महिला जगभरातील गोष्टी विसरून पार्टनरच्या बाहुपाशात रिलॅक्स होत असतात. त्यांच्यासाठी हे क्षण तणाव दूर करणारे असतात. त्यांना या वेळेत फार तणावमुक्त वाटतं.