लैंगिक जीवन : ....म्हणून शारीरिक संबंधासाठी डिसेंबर मानला जातो बेस्ट महिना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:25 IST2019-12-16T15:23:01+5:302019-12-16T15:25:18+5:30

तसा संपूर्ण हिवाळा हा शारीरिक संबंधासाठी सर्वात बेस्ट टाइम मानला जातो. याच दिवसात कपल्स अधिक रोमॅंटिक होतात.

Why December is the best month to have sex? | लैंगिक जीवन : ....म्हणून शारीरिक संबंधासाठी डिसेंबर मानला जातो बेस्ट महिना!

लैंगिक जीवन : ....म्हणून शारीरिक संबंधासाठी डिसेंबर मानला जातो बेस्ट महिना!

(Image Credit : verywellfamily.com)

तसा संपूर्ण हिवाळा हा शारीरिक संबंधासाठी सर्वात बेस्ट टाइम मानला जातो. याच दिवसात कपल्स अधिक रोमॅंटिक होतात. त्यातल्या त्यात डिसेंबर महिना हा शारीरिक संबंधासाठी सर्वात बेस्ट मानला जातो. पण याचं कारण या दिवसात खाल्ले जाणारे पदार्थ आहेत की, पार्टनर्ससोबत रजईत जवळ येणं. चला जाणून घेऊ कारण....

सेलिब्रेशनचा टाइम

डिसेंबरमध्ये संपूर्ण वर्षातील अडचणी, समस्या ख्रिसमस सेलिब्रेशनसोबत दूर करणे आणि नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह असतो. तसंही सेक्सचं दुसरं नाव हे सेलिब्रेशनच आहे. अशात मूड चांगला असेल तर पार्टनरसोबत जवळिकता चांगली वाढते.

वातावरणाची जादू

एक्सपर्ट्स सांगतात की, हिवाळ्यात जास्तीत जास्त लोकांची सेक्शुअल डिझायर वाढते. जेव्हा पार्टनर्स एकमेकांच्या शरीराला स्पर्श करतात तेव्हा शारीरिक संबंधाची इच्छा होते.

कामेच्छा वाढवणारे पदार्थ

हिवाळा हा खाण्याच्या चंगळसाठीही लोकप्रिय असा ऋतू मानला जातो. वेगवेगळी फळं, भाज्या या दिवसात खाल्ल्या जातात. आरोग्यासाठी पोषक असं वातावरण असतं. तसेच या दिवसात अनेकजण ड्रायफ्रूट्सही अधिक खातात त्यानेही कामेच्छा वाढते. तसेच चॉकलेटही हेच काम करतं.

सुट्टीचा महिना

डिसेंबर महिन्यात जास्तीत जास्त लोक सुट्टीवर जातात. एक्झॉटिक लोकेशन आणि खाणं-पिणं याने अनेकांचा मूड सेट होतो. एका रिसर्चनुसार कपल्स सुट्टीत जास्त शारीरिक संबंध ठेवतात. त्यामुळे हा डिसेंबर महिना शारीरिक संबंधासाठी बेस्ट मानला जातो.


Web Title: Why December is the best month to have sex?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.