लैंगिक जीवनाशी संबंधित 'या' गोष्टी किती खऱ्या किती खोट्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:46 PM2019-02-08T15:46:15+5:302019-02-08T15:46:58+5:30

चांगल्या लैंगिक जीवनासाठी जास्त ऑर्गॅज्म गरजेचा असतो. पण एका चांगल्या लैंगिक जीवनासाठी तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणे गरजेचं नसतं.

Truth and myths related to healthy sex life | लैंगिक जीवनाशी संबंधित 'या' गोष्टी किती खऱ्या किती खोट्या?

लैंगिक जीवनाशी संबंधित 'या' गोष्टी किती खऱ्या किती खोट्या?

Next

अनेकांचा हा समज असतो की, चांगल्या लैंगिक जीवनासाठी जास्त ऑर्गॅज्म गरजेचा असतो. पण एका चांगल्या लैंगिक जीवनासाठी तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणे गरजेचं नसतं. प्रत्येवळी परमोच्च आनंद मिळेलच असं नाही. त्यामुळे त्याचा अनुभव येत नसल्याने नाराज होण्याचीही गरज नाही आहे. असेच आणखी काही गैरसमज लैगिक जीवनाबाबत लोकांमध्ये असतात. ते काय हे जाणून घेऊ...

आधीच प्लॅन करणे

आजच्या लाइफस्टाइलमध्ये प्रत्येक काम हे प्लॅनिंग आणि शेड्यूल करून केलं जातं. काही लोक शारीरिक संबंधाबाबतही हीच पद्धत वापरतात. शारीरिक संबंधासाठी शेड्यूल ठरवणे काही चूक नाहीये. पण अनेकदा हे स्वैच्छिकही असतं. मात्र फायदा तेव्हाच होतो जेव्हा ही गोष्ट शेड्यूल करू नये. कारण तुमचा किंवा तुमच्या पार्टनरची लैंगिक इच्छा कधी जागृत होईल सांगता येणार नाही. 

जास्त वेळ आणि हळू लैंगिक क्रिया चांगली

शारीरिक संबंधासाठी योग्य वेळ येणे महागात पडू शकतं. त्यामुळे चांगलं होईल की, तुमचा किंवा तुमच्या पार्टनरचा मूड झाला तेव्हा याचा आनंद घ्यावा. जास्त वेळ लैंगिक क्रिया चालावी किंवा हळू हळू लैंगिक क्रिया करून फारसा फायदा होत नाही. मुळात हे तुमच्या हातात नसतंच. तसेच शारीरिक संबंधाने केवळ तुमची एनर्जी वाढते असे नाही तर याने तुम्ही अधिक अॅक्टिवही होता. लैंगिक क्रिया आणखी इंटरेस्टींग करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जर फायदा अधिक होईल.

दोघांची इच्छा असेल तर अधिक आनंद

अनेकदा दोघांचाही शारीरिक संबंधाचा मूड नसतो आणि यात काही गैरही नाही. गरजेचं नाही की, दोघेही प्रत्येकवेळी शारीरिक संबंधाच्या मूडमध्ये असतील. पण जर नेहमीच असं होत असेल तर तुम्हाला वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. कारण दोघांचीही इच्छा होत नाही म्हणजे काहीतरी समस्या असू शकते. ही समस्या वाढण्याआधी उपाय केलेला बरा.

आठवड्यातून तीनदा 

अनेक कपल्सना असं वाटत असतं की, चांगल्या लैंगिक जीवनासाठी आठवड्यातून तीन वेळा शारीरिक संबंध ठेवणे गरजेचे आहे. पण असं अजिबात नाहीये. कपल्स किती वेळा आणि कधी शारीरिक संबंध ठेवतात हे महत्त्वाचं नाहीये. तर लैंगिक क्रियेदरम्यान दोघांना किती आनंद मिळाला, ते संतुष्ट झाले की नाही या गोष्टी महत्त्वाच्या असतात. 

Web Title: Truth and myths related to healthy sex life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.