'या' रोजच्या गोष्टीमुळे बोरिंग होऊ शकतं तुमचं लैंगिक जीवन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 16:30 IST2019-07-23T16:23:32+5:302019-07-23T16:30:07+5:30
लैंगिक जीवनात भावना फार महत्त्वाची भूमिका साकारतात. भावनांचा रोल इतका मोठा असतो की, आपण विचारही करू शकत नाही.

'या' रोजच्या गोष्टीमुळे बोरिंग होऊ शकतं तुमचं लैंगिक जीवन!
(Image Credit : uhhospitals.org)
लैंगिक जीवनात भावना फार महत्त्वाची भूमिका साकारतात. भावनांचा रोल इतका मोठा असतो की, आपण विचारही करू शकत नाही. केवळ क्षणिक आनंदासाठी नाही तर परमोच्च आनंदासाठीही पार्टनर्सचं भावनिक पातळीवर एक होणं गरजेचं असतं. पण काही लोकांचं लैंगिक जीवन या भावनिक गोष्टींमुळे बोरिंग होऊन जातं.
वेगवेगळ्या ग्रहावरील प्राणी
जर कपल्समध्ये सुसंगतता नसेल तर त्यांच्यात सहजपणे ताळमेळ बसत नाही. विचार करण्याची किंवा समजण्याची पातळी वेगळी असल्याने दोघे एकमेकांबाबत असा विचार करतात की, ते वेगळ्या ग्रहावरून आले आहेत. या स्थितीमुळे त्यांच्यात भावनात्मक नातं मजबूत होऊ शकत नाही, ज्यामुळे लैंगिक जीवनातही अनेक समस्या येतात.
लूक्सबाबत अतिसतर्कता
असं अजिबात नाही की, केवळ महिलाच त्यांच्या लूक्सबाबत कॉन्शस राहतात. पुरूषांसोबतही असं होतं. पण दोघांपैकी एकालाही जर त्यांच्या लूक्सबाबत कॉन्शस असले तर शारीरिक संबंधावेळी सहजता राहत नाही. त्यामुळे दोघेही मोकळेपणा आनंद मिळवू शकत नाहीत.
डिप्रेशनही आहे एक कारण
आपल्या समाजात असं नेहमीच होतं. लोकांना माहितीच नसतं की ते डिप्रेशनचे शिकार आहेत. कारण त्यांना याबाबत फार माहिती नसते. अशात एक पार्टनर या समस्येशी झगडत असेल दुसरा पार्टनर ते समजूही शकत नसेल तरिही लैंगिक जीवन बोरिंग आणि तणावपूर्ण होतं.
वाढता रुटीन स्ट्रेस
आजकाल रोजच्या जगण्यात कामाचा इतका ताण वाढला आहे की, आपण जाणते-अजाणतेपणे तणावाच्या जाळ्यात अडकतो. अशात या तणावापासून वाचण्याचे पर्याय शोधावे. तसं न केल्यास तुमचं लैंगिक जीवनही कंटाळवणं होऊ शकतं.
डॉमिनेटिंग पार्टनर
अनेकदा असं होतं की, एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरचं अजिबातच काही ऐकत नाही. असं करणं काही लोकांसाठी सवयच होऊन बसते. जे लोक पार्टनरच्या बोलण्याकडे लक्ष न देता केवळ त्यांचीच मर्जी चालवतात, ते त्यांच्या पार्टनरसोबत मजबूत नातं तयार करू शकत नाहीत. अशा लोकांना पार्टनर असूनही एकटेपणा जाणवतो. याने तुमचं लैंगिक जीवनही बोरिंग होतं.