शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : शीघ्रपतन नेमकं कशामुळे होतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 16:36 IST

शीघ्रपतन या विषयासंदर्भात आम्ही काही डॉक्टरांची मतं जाणून घेतली. ही समस्या असल्यास डॉक्टर अनेक वेळा जोडप्यांना शारीरिक संबंध ठेवताना काही सूचना पाळण्याचा सल्ला देतात.

(Image Credit : tantranectar.com)

लग्नाला बरीच वर्षं झाल्यावरही लैंगिक जीवनात अनेकांना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे शीघ्रपतन. या समस्येमुळे अनेक कपल्स लैंगिक सुखाचा हवा तसा आनंद घेऊ शकत नाहीत आणि देऊही शकत नाहीत. अशात पती-पत्नी वेगवेगळया औषधांचा आधार घेतात. पण अनेकांना याचाही फायदा होताना दिसत नाही. 

काही जणांना तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात. त्यामुळे या विषयासंदर्भात आम्ही काही डॉक्टरांची मतं जाणून घेतली. ही समस्या असल्यास डॉक्टर अनेक वेळा जोडप्यांना शारीरिक संबंध ठेवताना काही सूचना पाळण्याचा सल्ला देतात. त्यात सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे, शारीरिक संबंध ठेवताना थोडा संयम ठेवावा आणि लैंगिक क्रिया थोडा वेळ थांबवून आवेग कमी होऊ द्यावा. अशाप्रकारे शीघ्रपतन टाळता येऊ शकतं. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूष लगेच का झोपतात? वाचा खरं कारण....)

समस्येची कारणे आणि उपाय

शीघ्रपतन होण्याची वेगवेगळी कारणे असतात. त्यातील  एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरसंबंधांमधील दिवसांचं अंतर. म्हणजे जर एकदा शारीरिक संबंध ठेवले असतील आणि त्यानंतर बरेच दिवस जोडीदार जवळ आले नाहीत, तर शीघ्रपतनाची समस्या होऊ शकते. बरेच दिवस शारीरिक संबंध न ठेवल्यास शुक्राणूंचा मोठा साठा होता आणि तो वाहून जाण्यासाठी तयार असते. अशावेळीही शीघ्रपतन होण्याची समस्या होते. 

डॉक्टरांनुसार, शीघ्रपतनाचा खरा संबंध हा व्यक्तीच्या स्वभावातील उतावळेपणा आणि घाई याच्याशी असतो. काहीजण शरीरसंबंध ठेवताना 'आऊट ऑफ कंट्रोल' होतात. त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो आणि पती-पत्नीचा अपेक्षाभंग होतो. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!)

मानसिक कारण

यावर उपाय म्हणून अनेकजण शारीरिक उपचार घेतात. पण मुळात हा व्यक्तीच्या स्वभावाचा दोष असल्याने शारीरिक उपचार घेऊन फायदा होत नाही. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेऊन आणि सेक्स थेरपी करून तुम्ही उपचार घेऊ शकता.  

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टर सल्ला देतात की, मुळात यात दोन मनांचा आणि शरीरांचा संबंध असतो. त्यामुळे पती-पत्नी दोघांनी याबाबत आधीच चर्चा करणं गरजेचं असतं. शारीरिक संबंध ठेवताना उत्साह अधिक वाढला असताना त्यावर नियंत्रण ठेवावं, थोडा वेळ थांबावं आणि त्यानंतर उत्साह पूर्णपणे कमी होण्याआधी लैंगिक संबंध ठेवावे. अशाप्रकारे थोडा वेळ घेत शारीरिक संबंध ठेवले तर शीघ्रपतनाची समस्या दूर करता येऊ शकते.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्स