लैंगिक जीवन : तुम्हाला शारीरिक संबंधाची सवय लागली कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 03:35 PM2019-12-09T15:35:51+5:302019-12-09T15:36:29+5:30

पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणं ही एक नैसर्गिक बाब आहे. पण नेहमीच शारीरिक संबंधाची इच्छा होत असेल तर हे फिजिकल अट्रॅक्शनपेक्षा अधिक असू शकतं.

Sex Life: Signs that you are in the habit of having sex! | लैंगिक जीवन : तुम्हाला शारीरिक संबंधाची सवय लागली कसे ओळखाल?

लैंगिक जीवन : तुम्हाला शारीरिक संबंधाची सवय लागली कसे ओळखाल?

googlenewsNext

(Image Credit : bollywoodhelpline.com)

पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणं ही एक नैसर्गिक बाब आहे. पण नेहमीच शारीरिक संबंधाची इच्छा होत असेल तर हे फिजिकल अट्रॅक्शनपेक्षा अधिक असू शकतं. आज आम्ही तुम्हाला काही लक्षणांबाबत सांगणार आहोत जे तुम्हाला सेक्स अ‍ॅडिक्शन झाल्याकडे इशारा करतात. शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही जर पुन्हा संबंध ठेवण्याची इच्छा होत असेल तर काही अंशी हे नॉर्मल आहे. पण जर अडिक्शन झालं असेल तर कितीही वेळा शारीरिक संबंध ठेवले तरी संतुष्टी मिळाल्याची जाणीव होत नाही.

जास्त हस्तमैथून करणे

हस्तमैथून किती वेळा करावं तशी तर याची काही सीमा नाही. पण जर कुणी रिकाम्या वेळेत केवळ शारीरिक संबंधाबाबत विचार करून हस्तमैथून करत असेल तर यावरून त्या व्यक्तीची शारीरिक संबंधाची सवय दिसून येते. 

नेहमी उतावळेपणा

कपल्समध्ये शारीरिक संबंध रोमान्सचा भाग आहे. पण जर व्यक्ती नेहमी घाई करत थेट पेनिस्ट्रेशनसाठीच धडपड करत असेल तर हा त्या व्यक्तीला शारीरिक संबंधाची सवय लागल्याचा संकेत असू शकतो.

लक्ष केंद्रीत करण्यात अडचण

Experts says women notice these 5 things in partner during intimate relation | लैंगिक जीवन :

सेक्स अ‍ॅडिक्ट स्थितीत व्यक्तीच्या मेंदूमध्ये सतत शारीरिक संबंधाबाबत विचार सुरू असतात. याचा परिणाम असा होतो की, ते दुसऱ्या गोष्टींवर लक्षच देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते वेगळं काही कामच करू शकत नाहीत.

एकटे असल्यावर पॉर्न बघत राहणे

Experts says women notice these 5 things in partner during intimate relation | लैंगिक जीवन :

एकटे असल्यावर नेहमी पॉर्न बघत राहणे हा सुद्धा सेक्स अ‍ॅडिक्शनचा एक इशारा आहे. इतकेच नाही तर इतर गोष्टी जसे की, सेक्स गेम, सेक्सटिंग इत्यादी गोष्टींमध्ये व्यस्त राहणे देखील तुम्हाला सवय लागल्याचा संकेत आहे.

जास्त लोकांसोबत संबंध

अ‍ॅडीक्शनने पीडित व्यक्तीला कामेच्छा कंट्रोल करण्यात फार अडचण निर्माण होते. ते पार्टनरसोबतच इतरांसोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास मागेपुढे बघत नाहीत. या स्थितीनंतर शक्य आहे की,  त्यांना वाईट वाटेल, पण ते त्यांच्या इच्छेवर कंट्रोल ठेवू शकत नाही.


Web Title: Sex Life: Signs that you are in the habit of having sex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.