लैंगिक जीवन : थंडीच्या दिवसात संबंधासाठी बेस्ट वेळ कोणती असते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:54 IST2020-01-04T15:46:12+5:302020-01-04T15:54:31+5:30
शारीरिक संबंधासाठी तसा कोणता निश्चित असा वेळ नसतो, थंडीच्या दिवसात सेक्शुअल डिजायरवर बाहेरील तापमान इतकं भारी पडतं की, लैंगिक इच्छाच दाबली जाते.

लैंगिक जीवन : थंडीच्या दिवसात संबंधासाठी बेस्ट वेळ कोणती असते?
(Image Credit : standard.co.uk)
शारीरिक संबंधासाठी तसा कोणता निश्चित असा वेळ नसतो, थंडीच्या दिवसात सेक्शुअल डिजायरवर बाहेरील तापमान इतकं भारी पडतं की, लैंगिक इच्छाच दाबली जाते. पण तरीही थंडीचे दिवस शारीरिक संबंधासाठी बेस्ट मानले जातात. या दिवसात शारीरिक संबंधाचा अधिक आनंद घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत.
शॉवरनंतर
थंडीने थरथरत असाल तर शारीरिक संबंधाबाबत विचारही येत नाही. त्यामुळे गरम पाण्याने शॉवर घेतल्यावर शरीराचं तापमान वाढून नॉर्मल झाली तर यावेळी सेक्शुअल डिजायर दाबली जाणार नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पार्टनरसोबत शॉवर सेक्सचाही आनंद घेऊ शकता.
झोपण्याच्या एक तास आधी
ब्लॅंकेट पाघरून घेतल्यावर शरीराचं तापमान नॉर्मल होऊ द्या. यासाठी शरीराला एक तासाचा वेळ द्या. यादरम्यान तुम्ही पार्टनरसोबतच किसिंग आणि फोरप्ले एन्जॉय करू शकता. याने नंतर तुम्हाला शारीरिक संबंधाचा अधिक आनंद मिळेल, तसेच ऑर्गॅज्मचाही अनुभव मिळेल.
वर्कआउटनंतर
वर्कआउटनंतर शरीरात फील गुड हार्मोन्स एड्रेनलिन आणि डोपामाइनचं प्रमाण वाढतं. सोबतच वर्कआउटने शरीराचं तापमानही वाढतं. अशात शारीरिक संबंध ठेवले तर आनंद दुप्पट मिळू शकतो.
जेवणानंतर
असे म्हटले जाते की, पोट भरलेलं असतं तेव्हा खासकरून महिलांना सेक्शुअल प्लेजरचा अनुभव होतो. शरीर थंड होण्याआधी शारीरिक संबंध ठेवले तर प्लेजर आणखी वाढू शकतो.
मॉर्निंग सेक्स
मॉर्निंग सेक्सने केवळ दिवसाची रोमॅंटिक सुरूवातच होणार नाही तर शरीर गरम झाल्याने शारीरिक संबंधाचा अनुभव आणखी जास्त येईल.