(Image Credit : thepost24.com)

वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स कायम राहणे फार गरजेचं आहे. शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनातील एक महत्वाचा भाग आहे. याने दोघांमधील जवळीकता, प्रेम वाढतं आणि दोघांचं नातं अधिक मजबूत होतं. हे कुणापासूनही लपलेलं नाही की, महिला बॉडी शेपबाबत फार जास्त विचार करतात. फिगराबाबत केल्या गेलेल्या कमेंट त्या मनावर घेतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, महिला पार्टनरचं प्रशंसा किंवा कौतुक करून तुम्ही तुमची लव्ह लाइफ चांगली करू शकता. तुमच्याकडून करण्यात आलेल्या कौतुकाने त्यांना कम्फर्टेबल वाटेल आणि त्या रोमॅंटिक क्षणांचा हवा तसा आनंद घेऊ शकतील. 

लैंगिक जीवनात नवा जोश

How men and women have different experience about first time sex | <a href='https://www.lokmat.com/topics/sex-life/'>लैंगिक जीवन</a> : पहिल्यांदा शारीरिक संबंधाचा अर्थ पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळा! 

तज्ज्ञ सुद्धा याला गोष्टीला दुजोरा देतात की, तुम्ही जर तुमच्या पार्टनरचं कौतुक कराल तर रोमॅंटिक क्षण आणखी चांगले होतील. काही लोकांनी एक फार शुल्लक किंवा छोटी गोष्ट वाटू शकते. पण याने मानसिक रूपाने सकारात्मक प्रभाव पडतो. महिला सुद्धा पार्टनरची प्रशंसा करून त्यांच्यात सकारात्मकता जागवू शकतात. जर शारीरिक संबंधावेळी पार्टनरकडून योग्य रिस्पॉन्स मिळत नसेल तर ही पद्धत वापरून बघू शकता. 

२०० महिलांवर करण्यात आला रिसर्च

Experiencing low sex drive improve it naturally | लैंगिक जीवन :

या रिसर्चमध्ये १८ ते ३० वयोगटातील २०० महिलांचा समावेश करण्यात आला होता. हा रिसर्च जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. हा रिसर्च करण्यासाठी महिलांना त्यांच्या शरीराबाबत प्रश्न विचारण्यात आलेत. त्यातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांचे पार्टनर त्यांच्या शरीराबाबत काय विचार करतात.

Why do men some men have breast milk fetish | लैंगिक जीवन : पुरूषांची उत्तेजना वाढवणारं वेगळंच

या रिसर्चमध्ये महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबतही प्रश्न विचारण्यात आलेत. त्यांना विचारण्यात आले की, त्यांना किती वेळा ऑर्गॅज्मचा अनुभव आला आणि त्यांची संतुष्टीची लेव्हल काय होती. तसेच त्यांच्याकडून हेही जाणून घेण्यात आले की, रोमांच आणि प्रेमावेळी त्यांना वेदना होतात की नाही.

काय निघाला निष्कर्ष?

Sex Life : Have you ever heard about these sexual disorders | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधाशी निगडीत

या रिसर्चच्या माध्यमातून हे जाणून घेता आलेकी, ज्या महिलांना आपल्या लूक्स आणि फिगरबाबत पार्टनरकडून प्रशंसा मिळाली, त्या शारीरिक संबंधावेळी जास्त आनंदी होत्या. आणि त्यांना संतुष्टीचा अनुभवही आला.  ज्या महिला त्याच्या बॉडी आणि लूक्सबाबत आनंदी राहत नाही, त्यांच्यापेक्षा या महिलांमध्ये सेक्स ड्राइव्हही अधिक होती. रिसर्चमधून असेही समोर आले की, इंटिमेट क्षणांदरम्यान जर महिलांची प्रशंसा केली गेली तर त्यांची कामेच्छा वाढते.


Web Title: Sex Life: Doing this one thing can make intimate relationship better says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.