अनेकदा महिला या गोष्टीने विचारात असतात की, त्यांचे पार्टनर शारीरिक संबंधात फार इंटरेस्ट का दाखवत नाहीत? ही तक्रार घेऊन अनेकदा सेक्सॉलॉजिस्टकडेही त्या जातात. आता या प्रश्नाचं उत्तर एका रिसर्चमधून समोर आलं आहे. या रिसर्चमधून समोर आलं आहे की, पुरूष अनेकदा शारीरिक संबंधात इंटरेस्ट नसल्याचं खोटा आव आणतात. जेणेकरून त्यांच्या पार्टनरने शारीरिक संबंधासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यांना शारीरिक संबंध ठेवता यावे.  

महिलांनी सुरूवातीला इंटरेस्ट दाखवला नाही

जर्नल ऑफ इव्होल्यूशनरी बिहेविरिअल सायन्सेजमध्ये प्रकाशित या रिसर्चचे मुख्य लेखक मॉन्स बेन्डिक्सन सांगता की, या रिसर्चमध्ये सहभागी महिला आणि पुरूष जेव्हा भेटले तेव्हा त्यातील अर्ध्यापेक्षा पुरूष म्हणाले की, ते महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात इंटरेस्टेड आहेत. तर जास्तीत जास्त महिलांनी सुरूवातीला शारीरिक संबंधासाठी इंटरेस्ट दर्शवला नाही. या रिसर्चमध्ये महिला कॅज्युअल सेक्ससाठी केवळ तोपर्यंत कमी इंटरेस्टेड वाटल्या जोपर्यंत त्यांना एखादा पुरूष फार जास्त आकर्षक दिसत नाही.

इंटरेस्ट असूनही पुरूषांची नसल्याची नाटकं

Sexual Life: Why men fall asleep after sex | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूषांना का येते झोप?

ते पुरूष जे कधीही आणि कुणासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास तयार असतात, असे पुरूष महिलांना अधिक पसंत नसतात. कदाचित हेच कारण आहे की, पुरूषांना शारीरिक संबंध ठेवायचे तर असतात पण खोटा आव आणतात की, त्यांना शारीरिक संबंधात इंटरेस्ट नाहीये. अभ्यासकांनुसार, हा एकप्रकारे स्टॅटीकचा म्हणजेच रणनीतिचा खेळ आहे. रिसर्चनुसार, महिला आणि पुरूषांचं त्यांना खरंच काही वाटणं आणि त्यांचा उद्देश हे ते एकमेकांना देत असलेल्या संकेतांपेक्षा वेगळे असू शकतात.  

महिला इंटरेस्टपेक्षा अधिक संकेत देतात

Common misconceptions and myths related to sex private parts that people believe | लैंगिक जीवन : पहिल्यांदा ब्लीडींग गरजेचं? जाणून घ्या अशाच काही गैरसमजांबाबत...

जे पुरूष शारीरिक संबंधासाठी फार जास्त इंटरेस्टेड असतात ते त्यांना शारीरिक संबंध ठेवायचेत असे संकेत देणे कमी करतात. तेच दुसरीकडे या रिसर्चनुसार, महिला प्रत्यक्षात शारीरिक संबंधासाठी जेवढ्या इंटरेस्टेड असतात, त्या त्यापेक्षा अधिक इंटरेस्टेड असल्याचे संकेत देतात. अभ्यासकांनुसार महिला असं करतात कारण पुरुषांना त्यांच्याबाबत वाटणारं अटेंशन जास्त वेळेसाठी कायम रहावं.


Web Title: In order to get sex men act less interested in it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.