लैंगिक जीवन : 'या' गोष्टीसाठी महिलांपेक्षा तीन पटीने पुढे असतात पुरूष!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 03:32 PM2019-05-20T15:32:30+5:302019-05-20T15:34:19+5:30

जेव्हा विषय शारीरिक संबंधाचा येतो तेव्हा यात जराही शंका नाही की, पुरूषच जास्तीत जास्त वेळ पुढाकार घेतात.

News study says that men initiate sex three times more than women do | लैंगिक जीवन : 'या' गोष्टीसाठी महिलांपेक्षा तीन पटीने पुढे असतात पुरूष!

लैंगिक जीवन : 'या' गोष्टीसाठी महिलांपेक्षा तीन पटीने पुढे असतात पुरूष!

Next

जेव्हा विषय शारीरिक संबंधाचा येतो तेव्हा यात जराही शंका नाही की, पुरूषच जास्तीत जास्त वेळ पुढाकार घेतात. आता तर ही बाब एका रिसर्चमधूनही सिद्ध झाली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये शारीरिक संबंधासाठी पुढाकार घेण्याची वृत्ती तीन पटीने अधिक असते. 

महिलांच्या पु़ढाकारात दोन मुद्दे महत्त्वाचे

या रिसर्चनुसार, फार जास्त काळ सतत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची महत्त्वाची भूमिका असते. इव्हॉल्युशनरी बिहेविअरल सायन्सेज नावच्या जर्नलमध्ये प्रकाशित या शोधानुसार, महिला शारीरिक संबंधासाठी पुढाकार घेणार की, नाही यासाठी २ गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. कॅज्युअल सेक्सप्रति महिलांचा अॅटिट्यूड आणि पॅशन या दोन गोष्टींचा समावेश आहे. 

संबंधावेळी वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या

Sexual interest is getting reduced of your female partner then adopt these special tips | लैंगिक जीवन : पार्टनरचा इंटरेस्ट कमी झालाय? वापरा या नॉटी टिप्स!

तसे तर शारीरिक संबंधात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसे की, लोक त्यांच्या नात्यात किती आनंदी असतात, तसेच त्यांचं त्यांच्या जोडीदारासोबत किती चांगलं ट्यूनिंग आहे, ते एकमेकांवर किती प्रेम करतात आणि एकमेकांवर किती विश्वास ठेवतात. 

नात्यात उत्साह आणि पॅशनला महत्त्व

Sexual life: Women body may changes like that during sex | लैंगिक जीवन : उत्तेजित झाल्यावर महिलांच्या शरीरात होतात

नॉर्वेची यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचे ट्रोंड विगो ग्रोंटवेड्ट यांचं म्हणणं आहे की, नात्यात उत्साह आणि भावनिकता असणं फार महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. ते म्हणाले की, भावना वेगवेगळ्या पातळ्यांवर महत्त्वाची भूमिका निभावते. या रिसर्चमध्ये १९ ते ३० वयोगटातील ९२ जोडप्यांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. जे एक महिन्यांपासून ते ९ वर्षांपर्यंत सोबत होते. या जोडप्यांनी एका आठवड्यात सरासरी २ ते ३ वेळा शारीरिक संबंध ठेवले. जेवढं जास्त जुनं नातं होतं, तेवढा कमी वेळ त्यांनी शारीरिक संबंध ठेवले.  

दुसऱ्यांप्रति इच्छा भावना कमी करते

You should know that partners special day, When they are the most desires of sex | लैंगिक जीवन :

एनटीएनयूचे सहायक प्राध्यापक मोंस बेनडिक्सन म्हणाले की, रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, दुसऱ्याप्रति इच्छा असेल तर भावना कमी होते. ते म्हणाले की, आपल्या साथीदाराच्या तुलनेत दुसऱ्यासोबत शारीरिक संबंधाची अधिक इच्छाही नात्यातील भावनिकता कमी करते. 

Web Title: News study says that men initiate sex three times more than women do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.