(Image Credit : independent.co.uk)

रिलेशनशिपमध्ये एकमेकाप्रति प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. हे रिलेशनशिप एका वेगळ्याच उंचीवर तेव्हाच जातं, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत फार खाजगी क्षणांमध्ये कम्फर्टेबल होता. नात्यात इंटिमेट क्षणांचं फार महत्त्व असतं. याने दोन व्यक्ती फार जवळ येतात. याने तुम्हाला जगण्याचं आणि आनंदाच कारण मिळतं. 

These are the common sexual problems couple face | लैंगिक जीवनात अनेकांना करावा लागतो

पण जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवूनही संतुष्ट नसाल तर याचा कुठे ना कुठे तुमच्या जीवनावर प्रभाव पडू शकतो. अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी वैवाहिक जीवनात दोघेही लैंगिक सुखाचा हवा तो आनंद घेऊ शकत नाही. तुमच्याबाबतही असं झालं असेल तर एका सर्व्हेमुळे तुम्हाला मदत मिळू शकते. या सर्व्हेनुसार, शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान जुराब म्हणजेच मोजे परिधान केल्यास संतुष्टी मिळण्याची शक्यता अधिक वाढते.  

काय सांगतो सर्व्हे?

शारीरिक संबंध आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींवर सतत रिसर्च केले जात असतात. नुकताच लैंगिक जीवनात संतुष्टीबाबत एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेच्या रिपोर्टमधून हे समोर आलं की, जर महिला मोजे घालून पार्टनरसोबत इंटिमेट होतील तर त्यांना ऑर्गॅज्मचा आनंद मिळण्याची शक्यता अधिक वाढते. 

(Image Credit : dailymail.co.uk)

सर्व्हेचा निष्कर्ष

नेदरलॅंडच्या गोनिन्जम यूनिव्हर्सिटी व्दारे हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतील अभ्यासकांना असं आढळलं की, मोजे घालून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या ८० टक्के जोडप्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव आला. 

मोजे घातल्याने काय होतो फायदा?

या सर्व्हेच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की, दोन्ही पायांमध्ये मोजे घालून झोपल्यास शरीराची उष्णता कायम राहते. या मोज्यांमुळे पायांमध्ये ब्लड सर्कुलेशन कायम राहतं. हेच ब्लड सर्कुलेशन शारीरिक संबंधादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावतं. याच्या मदतीने तुम्ही शारीरिक संबंध ठेवताना अधिक सक्रिय राहता. 


Web Title: Little formula for better sex wear socks during sexual relationship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.