लैंगिक जीवन : Kiss चे हे फायदे वाचाल तर हा गोडवा कधी Miss नाही करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:47 PM2019-06-05T15:47:45+5:302019-06-05T15:56:04+5:30

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, किस केल्याने तुमचं आयुष्य वाढतं तर तुम्ही हैराण होऊ शकता. पण यात चुकीचं काही नाही, हे खरं आहे.

Kissing a partner can make live longer and know its benefit | लैंगिक जीवन : Kiss चे हे फायदे वाचाल तर हा गोडवा कधी Miss नाही करणार!

लैंगिक जीवन : Kiss चे हे फायदे वाचाल तर हा गोडवा कधी Miss नाही करणार!

googlenewsNext

(Image Credit : Bonobology.com)

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, किस केल्याने तुमचं आयुष्य वाढतं तर तुम्ही हैराण होऊ शकता. पण यात चुकीचं काही नाही, हे खरं आहे. हे आम्ही नाही तर एका रिसर्चमधून सिद्ध करण्यात आलं आहे. या रिसर्चनुसार, तुम्ही अधिक तरूण दिसाल आणि सोबतच वेगवेगळ्या आजारांपासूनही बचाव करू शकता. पण सामान्यपणे लग्नानंतर अनेक पुरूष हे किस करण्यावर फार भर न देता थेट शारीरिक संबंधाकडे वळतात. अशाप्रकारच्या तक्रारी सुद्धा सेक्सॉलॉजिस्टकडे महिला करतात. पण कदाचित या लोकांना किस करण्याचे फायदे माहीत नसतील. त्यामुळे किस करण्याचे फायदे तुम्हाला कळावे म्हणून आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

(Image Credit : healthmagazine.news)

सर्वांच्याच लाळेतील ८० टक्के बॅक्टेरिया एकसारखे असतात. केवळ २० टक्के बॅक्टेरिया वेगळे असतात. किस केल्याने बॅक्टेरियांची अदलाबदली होते. याने पुढे अ‍ॅंटीबॉडी विकसित होण्यास मदत मिळते. हेच अ‍ॅंटीबॉडी तुमच्या शरीरातील संक्रमणाशी लढतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या आजारांना तुम्ही दूर करू शकता.

ब्लड प्रेशर कमी होतं

Study says Gonorrhea a sexually transmitted infection may also be found in the throat by doing french kiss | लैंगिक जीवन : डीप किसिंगमुळे होऊ शकतो गोनोरिया!

किस करताना तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या हृदयाची धडधड ऐूक शकता. किस हृदयाचे ठोके नियंत्रित करतो आणि ब्लड सेल्सला पातळ करतो. ज्यामुळे थेट ब्लड प्रेशर लेव्हल कमी होते.

फुप्फुसाच्या आजारापासून बचाव

(Image Credit : TikhaKura-Everything for you)

एका मिनिटात तुम्ही जेवढ्या जास्त वेळ श्वास घ्याव तेवढं फुप्फुसासाठी चांगलं असतं. जर तुम्ही किस करताना एका मिनिटात २० वेळा श्वास घेत असाल तर हे प्रमाण एका मिनिटात ६० टक्क्यांनी वाढतं. त्यामुळे किस करणं फुप्फुसासाठी व्यायाम आहे. 

स्ट्रेस होतो कमी

(Image Credit : Business Insider)

२००९ मध्ये करण्यात अ‍ॅफेक्शन एक्सचेन्ज थेअरीनुसार असे सांगण्यात आले आहे की, किस केल्याने व्यक्तीचा स्ट्रेस कमी होतो. किस केल्याने दोन्ही व्यक्तींच्या मेंदूवर प्रभाव होतो. किस केल्याने हॅपी हार्मोन Oxytocin रिलीज होतात. याने कॉर्टिसोल हे स्ट्रेस हार्मोन्स दूर होतात.

नातं होतं मजबूत

(Image Credit : OnHealth)

किसींग करताना  Oxytocin हे हार्मोन्स रिलीज होतात. या हार्मोन्समुळे दोन लोकांमधील बॉन्ड मजबूत होतो. हे आपण सर्वांनाच माहीत आहे की, दोन लोक जेव्हा किस करतात तेव्हा त्यांची जवळीकता वाढते. याने नातं आणखी मजबूत होतं.

कॅव्हिटी होते दूर

(Image Credit : YouTube)

किस केल्याने तुमच्या दातांचं आरोग्य देखील चांगलं राहतं. कॅव्हिटीची समस्या दूर होते. किस केल्याने साल्विया रिलीज होतात. हे तत्त्व दातांमध्ये कॅव्हिटी, किड आणि प्लार्क निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला दूर करतात.

वेदना विसराल

अनेकजण वेदना दूर करण्यासाठी किस करतात. किस दरम्यान शरीरात एड्रेलिन नावाचे हार्मोन रिलीज होतात. ज्यामुळे शरीरात होणारी वेदना दूर होते. तसेच किस केल्याने डोकेदुखीही दूर होते. मासिक पाळीदरम्यानही किस कराल तर पार्टनरला होणाऱ्या वेदना दूर होतील. 

Web Title: Kissing a partner can make live longer and know its benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.