शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नवं संशोधन... नियमित शरीरसंबंध ठेवल्यास महिलांना असाही मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 3:26 PM

नियमित शरीरसंबंध न ठेवल्यास आरोग्यावर परिणाम

नियमित शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलांच्या आयुष्यात रजोनिवृत्ती उशिरा येते असं एका संशोधनातून समोर आलं. नियमित शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या महिलांची मासिक पाळी लवकर बंद होते, असं रॉयल सोसायटी ओपन सायन्सचा अहवाल सांगतो. नियमित शरीर संबंध ठेवणं महिलांसाठी फायदेशीर असल्याचं यातून अधोरेखित झालं आहे. आठवड्यातून एकदा शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलांची मासिक पाळी लवकर बंद होण्याची शक्यता महिन्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांच्या तुलनेत २८ टक्क्यांनी कमी असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. नियमित शरीरसंबंध ठेवल्यामुळे शरीराला गर्भधारणा होण्याचे संकेत मिळतात. त्यानुसार शरीराच्या मासिक पाळीचं चक्र फिरतं. ते शरीरासाठी फायदेशीर असतं. याउलट मध्यमवयीन म्हणजेच ३५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिला नियमित शरीरसंबंध ठेवत नसल्यास त्यांची मासिक पाळी लवकर बंद होऊ शकते, असं अहवाल सांगतो. 'एखादी महिला नियमित शारीरिक संबंध ठेवत नसल्यास शरीराला गर्भधारणेबद्दलचे कोणतेही संकेत मिळत नाहीत. त्यामुळे शरीर ऑव्युलेशन प्रक्रिया (बीजकोश फुटून जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया) बंद करतं,' असं युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या मेगन अर्नोट यांनी सांगितलं. ऑव्युलेशन प्रक्रियेदरम्यान महिलांची रोगप्रतिकारकक्षमता कमी होते. त्यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. जवळपास ३ हजार महिलांशी संवाद साधून हे संशोधन करण्यात आलं. यासाठी महिलांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. गेल्या सहा महिन्यात तुम्ही किती वेळा शरीरसंबंध ठेवले, ते किती नियमित होते, असे प्रश्न महिलांना विचारले गेले. संशोधनात सहभागी झालेल्या ६४ टक्के महिलांनी त्या आठवड्यातून एकदा शरीरसंबंध ठेवत असल्याचं सांगितलं. तीन हजार महिलांपैकी १३२४ जणींनी म्हणजेच ४५ टक्के महिलांनी त्यांची मासिक पाळी नेमकी कधी बंद झाली, याची आकडेवारी सांगितली. या आकडेवारीची सरासरी काढल्यास महिलांची मासिक पाळी ५२ व्या वर्षी बंद होते.