लैंगिक जीवन : 'या' ठिकाणांवर इंटिमेट होणं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 15:22 IST2019-04-17T15:22:50+5:302019-04-17T15:22:56+5:30
जर लैंगिक जीवन रुटीन लाइफसारखं झालं तर कंटाळा येतो आणि मग यात आधीसारखा उत्साह आणि रोमांच राहत नाही.

लैंगिक जीवन : 'या' ठिकाणांवर इंटिमेट होणं पडू शकतं महागात!
जर लैंगिक जीवन रुटीन लाइफसारखं झालं तर कंटाळा येतो आणि मग यात आधीसारखा उत्साह आणि रोमांच राहत नाही. अशात अनेक लोक लैंगिक जीवन स्पायसी आणि मजेदार करण्यासाठी काहीना काही एक्सपरिमेंट करत असतात. यातील एक म्हणजे वेगवेगळ्या जागांवर शारीरिक संबंध ठेवणे. पण बेडरुम आणि खासकरुन घराबाहेर शारीरिक संबंध ठेवणे फारच घातक ठरु शकतं. अशाच काही ठिकाणांबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
अंडरवॉटर
अंडरवॉटर म्हणजे पाण्यात रोमॅंटिक आणि इंटिमेट होण्याचे अनेक सीन्स तुम्ही सिनेमात पाहिले असतील. पण पाण्यात प्रत्यक्षात पेनिस्ट्रेशन करणं फार नुकसानकारक ठरु शकतं. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जर स्वीमिंग पूलच्या पाण्यात क्लोरीनसारखे अनेक केमिकल्स असतात. जर तुम्ही समुद्राच्या पाण्यात मस्ती करत असाल तर समुद्राच्या पाण्यात मिठाचं प्रमाण अधिक असतं. या दोन्ही गोष्टी जर शरीरात गेल्या तर खाज आणि इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. पाण्यात शारीरिक संबंध ठेवण्याने STD आणि UTI सारखे आजार होण्याचाही धोका असतो.
शॉवरखाली
शॉवरखाली शारीरिक संबंध ठेवायचे म्हटलं तरी अनेकांची उत्तेजना वाढते. पण असं करण तुम्हाला महागात पडू शकतं. अंडरवॉटरप्रमाणेच शॉवरखाली शारीरिक संबंध ठेवल्याने काही गोष्टींचं नुकसान होतं. कारण शॉवरमधून येणाऱ्या पाण्याच्या धारेने प्रायव्हेट पार्टमधील नैसर्गिक चिकटपणा निघून जातो. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना वेदना आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळे शॉवरखाली शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर जज्ज्ञांच्या सल्ल्याने लुब्रिकंटचा वापर करा.
पब्लिक प्लेस
कमी गर्दी असलेल्या ठिकाणावर पार्टनरसोबत इंटिमेट होणे फारच धोकादायक आहे. इतकेच नाही तर पब्लिक प्लेसवर केलेली चुकीची वागणूक कायदेशीर गुन्हा आहे. यासाठी ३ महिन्यांचा तुरुंगवास आणि दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे पब्लिक प्लेसवर कितीही उत्तेजना वाढली तरी स्वत:वर नियंत्रण ठेवा.
कारमध्ये
अनेक सिनेमे आणि सिरीअल्समध्ये तुम्ही कपल्सना कारमध्ये इंटिमेट होताना किंवा शारीरिक संबंध ठेवताना पाहिले असेल. असंच काहीसं करण्याचं तुमचंही कधी मन झालं असेल. अनेकांना वाटतं की, कारमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने कुणाला कळणार नाही. पण असं नाहीये. कारमध्ये असं काही करणं महागात पडू शकतं. कारण पब्लिक प्लेसमध्ये कारमध्ये असं करणं गुन्हा ठरतो.
वर्कप्लेस
ज्या ठिकाणांवर चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नये त्या ठिकाणांमध्ये सर्वात पहिलं ठिकाण येतं वर्कप्लेस. वर्कप्लेसवर असं काही करण्याचा विचार करणे म्हणजे मुर्खपणाच ठरेल. जास्तीत जास्त ऑफिसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की, तुम्हाला कुणीतरी बघतंय तर तुम्ही चुकताय. तुमच्यावर कुणाचीही नजर पडू शकते. अशात तुमचं नाव खराब होऊ शकतं नाही तुमची नोकरीही जाऊ शकते.