Experts says women notice these 5 things in partner during intimate relation | लैंगिक जीवन : 'त्यावेळी' पुरूषांच्या 'या' खास गोष्टींना अधिक नोटीस करतात महिला!

लैंगिक जीवन : 'त्यावेळी' पुरूषांच्या 'या' खास गोष्टींना अधिक नोटीस करतात महिला!

(Image Credit : boldsky.com)

शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. सुखी संसारासााठी जोडप्याचं लैंगिक जीवन आनंदी राहणं महत्वाचं आहे. एकमेकांबद्दलचं प्रेम, काळजी व्यक्ती करण्याचा हा एक महत्वाचा मार्ग मानला जातो. असे म्हणतात की, या क्षणांमध्ये दोघेही सगळं काही विसरून एकमेकात हरवलेले असतात. पण खरंच असं होतं का? काही तज्ज्ञ यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाहीत. 

अभ्यासकांनुसार, शारीरिक संबंध ठेवतेवेळीही लोक आपल्या पार्टनरच्या वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. आणि हे काम जास्तकरून महिला करतात. तज्ज्ञांनुसार, महिलांचं कॉन्शिअस मन हे त्यावेळी तिथे असतं. पण त्यांचं सब-कॉन्शिअस मन त्यांच्या पार्टनरला ऑब्जर्व करत असतं. एका रिसर्चनुसार, महिला शारीरिक संबंध ठेवताना पाच गोष्टींकडे लक्ष देतात. 

पार्टनरचा श्वास

शारीरिक संबंधादरम्यान श्वास घेण्याचा वेग वाढतो. या स्थितीत तुम्ही तुमच्या पार्टनरच्या इतक्या जवळ असता की, त्यांच्या श्वासातील गरमी तुम्हाला जाणवू शकते. एक्सपर्ट सांगतात की, महिला शारीरिक संबंध ठेवताना पार्टनरच्या श्वासांना नोटीस करतात. इंटीमेट क्षणांवेळी किस, मिठी मारणे इत्यादी क्रियांमध्ये श्वासात होणाऱ्या चढ-उतारांना महिला नोटीस करतात आणि त्याने त्या प्रभावित होतात.

पार्टनरच्या शरीराचा आकार आणि वजन

शारीरिक संबंध ठेवतानाच एका महिलेला किंवा पुरूषाला आपल्या पार्टनरच्या वजनाची जाणीव होते. अभ्यासकांचं असं मत आहे की, महिलांना पुरूषांचं जास्त वजन पसंत असतं. महिलांना त्यांच्या पार्टनरचा भार हा त्यांच्या पुरूषार्थाची जाणीव करून देतं. इंटिमेट रिलेशनमध्ये महिला पुरूषांच्या शरीराच्या आकारवरही लक्ष देतात. त्यांचा फोकस छाती, मांड्या आणि बाहूंवर असतो. 

पार्टनरच्या जिभेची टेस्ट

अभ्यासकांचं असं मत आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जिभेची टेस्ट वेगवेगळी असते. शारीरिक संबंध ठेवताना महिला त्यांच्या पार्टनरच्या जिभेची टेस्ट फार बारकाईने घेतात. इतकेच नाही तर स्त्रिया पार्टनरच्या जिभेने स्पर्श करण्याच्या पद्धतीला आणि त्यामुळे होणाऱ्या उत्तेजनेला नेहमी लक्षात ठेवतात.

बोटांच्या हरकती

शारीरिक संबंधादरम्यान महिला पार्टनरच्या हातांच्या स्पर्शालाही नोटीस करतात. त्या त्यांच्या बोटांचा आकार, लांबी आणि बोटांच्यामधील गॅपवरही लक्ष देतात. तसेच हातांच्या हरकती आणि गतीवरही लक्ष देतात.

पार्टनरचे बदलते एक्सप्रेशन

अभ्यासकांनुसार, शारीरिक संबंधावेळी पुरूष कसे दिसतात याचाही महिलांवर फार प्रभाव पडतो. शारीरिक संबंध ठेवताना पुरूष फार उत्तेजित होतात. त्यांच्या चेहऱ्यावर येणारे वेगवेगळे भावही महिला नोटीस करतात.

Web Title: Experts says women notice these 5 things in partner during intimate relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.