लैंगिक जीवन : शारीरिक संबंधात मोठा गॅप पडला तर शरीराचं काय होतं नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 15:26 IST2019-07-20T15:18:30+5:302019-07-20T15:26:48+5:30

मुळात याने काही गंभीर परिणाम होत नसला तरी सुद्धा शारीरिक संबंधातून तुम्ही मोठा ब्रेक घेतला असेल तर तुमच्या शरीराच्या सिस्टीममध्ये गडबड होऊ शकते.

Beware this happens to your body when you do not have sex | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधात मोठा गॅप पडला तर शरीराचं काय होतं नुकसान?

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधात मोठा गॅप पडला तर शरीराचं काय होतं नुकसान?

(Image Credit : Eric Bakker ND)

वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधाला किती महत्व असतं हे कदाचित जास्तीत जास्त लोकांना माहीत असेल. पण काही लोक लैंगिक जीवनाबाबत बेजबाबदारपणे वागतात. या लोकांना हे माहीत नसतं की, याचा त्यांच्या शरीरावर काय प्रभाव पडणार आहे. मुळात याने काही गंभीर परिणाम होत नसला तरी सुद्धा शारीरिक संबंधातून तुम्ही मोठा ब्रेक घेतला असेल तर तुमच्या शरीराच्या सिस्टीममध्ये गडबड होऊ शकते. काय गडबड होऊ शकते हे खालीलप्रमाणे जाणून घेऊ...

कामेच्छा कमी होणे

काही कारणाने तुमच्या शारीरिक संबंध ठेवण्यात मोठा खंड पडला असेल तर तुम्हाला कामेच्छा कमी झाल्याची जाणीव होऊ शकते. सोबतच तुमचा शारीरिक संबंधातील रसही कमी होऊ लागतो. इतकेच नाही तर कामेच्छा नष्ट झाल्यावरही तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला संतुष्टी आणि आनंद मिळणार नाही.

लूब्रिकेशनची कमतरता

(Image Credit : Spectator Life)

काही महिलांमध्ये जर शारीरिक संबंध ठेवण्याचा खंड पडला असेल तर याचे काही साइड इफेक्ट बघायला मिळतात. त्यात त्यांच्या व्हजायनामध्ये ड्रायनेस जाणवू शकते. खासकरून जास्त वयाच्या महिला जर मोठ्या गॅपनंतर शारीरिक संबंध ठेवणार असतील तर त्यांना लूब्रिकेशनची कमतरता असल्याने त्रासाचा सामना करावा लागू शकतो.

वाढलेला स्ट्रेस

(Image Credit : Daily Record)

शारीरिक संबंधाकडे एक स्ट्रेसबस्टर उपाय म्हणून पाहिलं जातं. असं असण्याचं कारण म्हणजे शारीरिक संबंधादरम्यान शरीरात फील-गुड हार्मोन रिलीज होतात. ज्यामुळे आपला प्रत्येक प्रकारचं तणाव दूर होतो. अशात शारीरिक संबंधात मोठा खंड आणि फील-गुड हार्मोन रिलीज न होणे यामुळे स्ट्रेस लेव्हल मॅनेज करणे कठीण होऊन बसतं.

पीरियड्स दरम्यान त्रास

(Image Credit : Deccan Chronicle)

शारीरिक संबंधामुळे केवळ तणावच नाही तर वेगवेगळ्या वेदनांमधून सुटका मिळते. इतकेच नाही तर शारीरिक संबंधामुळे मासिक पाळीदरम्यान येणारे क्रॅम्प्स दूर होतात. जेव्हा एखादी महिलेला मासिक पाळीदरम्यान ऑर्गॅज्मचा आनंद मिळाला तर तेव्हा यूट्रीन कॉन्ट्रॅक्शनमुळे शरीरातून स्त्राव होणाऱ्या रक्ताचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे वेदना कमी होतात. 

अस्वस्थता आणि त्रास 

(Image Credit : Chantelle Otten Sexologist)

नेहमीच असं बघायला मिळतं की, जेव्हा तुम्ही मोठ्या ब्रेकनंतर शारीरिक संबंध ठेवता तेव्हा इतर दिवसांपेक्षा अधिक वेदना आणि अस्वस्थता जाणवते. सोबतच व्हजायनामध्ये सूजही येऊ शकते. तसेच मांसपेशींमध्येही वेदना होतात. असं होण्याचं कारण म्हणजे तुमच्या शरीराला शारीरिक संबंधाची सवय झालेली असते.

Web Title: Beware this happens to your body when you do not have sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.