जिल्हा परिषदेच्या ५७६ शाळांच्या इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:26+5:302021-06-17T04:26:26+5:30
सातारा : कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी जिल्ह्यातील ५७६ शाळांच्या इमारती धोकादायक ...

जिल्हा परिषदेच्या ५७६ शाळांच्या इमारती धोकादायक
सातारा : कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी जिल्ह्यातील ५७६ शाळांच्या इमारती धोकादायक झाल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत. ४८२ शाळांच्या पन्नास वर्गखोल्या नव्याने बांधण्यास प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. ४८२ खोल्या पाडल्या असून, ९४ खोल्या पाडण्याच्या शिल्लक आहेत. मात्र, अद्यापही वर्गखोल्या नादुरुस्त असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांच्या दुरुस्तीचे काम दरवर्षी करण्यात येते. अतिवृष्टी, वादळ यासह जुन्या इमारतींमुळे वर्गखोल्यांचे नुकसान होते. प्रशासनाकडून सर्व शाळांमध्ये जाऊन धोकादायक इमारतींसह वर्गखोल्यांचेही सर्वेक्षण करण्यात येते. त्याची यादी करून ती संबंधित शाळेच्या इमारतीसाठी किती निधी आवश्यक आहे याबाबत आराखडा तयार करून शिक्षण विभागातर्फे शासनाकडे सादर केला जातो. जिल्ह्यातील ... धोकादायक शाळा ‘निर्लेखित’ जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवाय ... वर्गखोेल्या नादुरुस्त असल्याचे जाहीर करून त्यासाठी... हजारांचा निधी आवश्यक आहे. निधी मंजूर झाल्यानंतरच या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
अशा शाळेत मुले पाठवायची कशी?
कोरोनामुळे गेले दीड वर्ष मुलांची शाळा प्रत्यक्षात सुरूच झाली नाही. यावर्षीही गतवर्षीप्रमाणेच स्थिती आहे. भविष्यात कोरोनाची संख्या कमी होऊन शाळा पुन्हा भरतील. त्यामुळे शासनाने धोकादायक शाळा, वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी परवानगी देऊन निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भविष्यात वर्गखोल्यांची, शाळांची आवश्यकता भासणार आहे.
- संगीता नारकर, सातारा
पूर्वीच्या जुन्या इमारतीत शाळा भरत असल्यामुळे अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे कोलमडतात. सध्या कोरोनामुळे मुले घरीच राहून अध्यापन करीत आहेत. शिक्षकांना अध्यापन व अन्य कामकाजासाठी शाळेत जावेच लागणार आहे. त्यामुळे नादुरुस्त शाळा किंवा इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंजुरी देणे आवश्यक आहे. परंतु, नव्याने मंजुरी मात्र गरजेची आहे.
- ज्ञानेश्वर कांबळे, सातारा
कोट :
धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यांची संख्या व त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा
पॉईंटर
जिल्ह्यातील एकूण शाळा :
एकुण विद्यार्थी :
धोकादायक इमारती : ५७६
कोणत्या तालुक्यात किती धोकादायक?
सातारा : १८
जावळी :
फलटण : १९
कऱ्हाड :
पाटण :
कोरेगाव : २२
माण :
खटाव :
महाबळेश्वर : ६
वाई : ४८
खंडाळा : ५२