शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणाला २० वर्षांची शिक्षा; पीडिता गरोदर राहिल्याने प्रकरण आले होते उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:34 IST

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत तिला गर्भवती केले होते. याप्रकरणी शिरवळ येथील ...

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत तिला गर्भवती केले होते. याप्रकरणी शिरवळ येथील एका २६ वर्षीय तरुणाला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी दोषी ठरवत २० वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सूरज महादेव चव्हाण (२६, रा. शिरवळ, ता. खंडाळा), असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.२९ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला त्याने घरी बोलावून घेतले. ‘मला भाकरी टाकून दे,’ असे सांगून अल्पवयीन मुलगी भाकरी टाकून देत असताना जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही सूरज चव्हाण याने दोन ते तीन वेळा पीडितेवर बलात्कार केला. त्यातून संबंधित मुलगी गरोदर राहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले. पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी सूरज चव्हाण याला अटक करून तपास करून वाई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सूरज चव्हाण याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवून २० वर्षांचा कारावास ठोठावला.अतिरिक्त सरकारी वकील महेश शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस अंमलदार धीरज टिळेकर, अंमलदार काळे, कीर्तीकुमार कदम, घोरपडे, कदम, शिंदे, कुंभार, बांदल यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय