वाई (जि. सातारा) : पाकिस्तानचा ध्वज आणि भारतविरोधी मजकूर असलेला स्टेटस मोबाइलवर ठेवल्याप्रकरणी एका तरुणास वाई पोलिसांनी अटक केली. शुभम दशरथ कांबळे (रा. जांभळी, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संकेत सुरेश चिकणे (रा. सोनगिरवाडी, ता. वाई) यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.संशयित शुभम कांबळे याने पाकिस्तानचा झेंडा आणि भारतविरोधी मजकुराचा मोबाइल स्टेटस ठेवला होता. त्याच्या मित्राने गुरुवारी (२४ एप्रिल) सायंकाळी तो स्टेटस पाहिला. याप्रकरणी त्याने वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम कांबळे याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
Satara: पाकिस्तानचा ध्वज, भारताविरोधी मजकूर असलेला स्टेटस; वाईतील युवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:08 IST