युवामहोत्सवात थिरकली पावलं...
By Admin | Updated: February 10, 2015 00:28 IST2015-02-09T21:04:45+5:302015-02-10T00:28:54+5:30
गौरीशंकर : मानसी मोघे, केतकी माटेगावकर यांची हजेरी

युवामहोत्सवात थिरकली पावलं...
सातारा : ‘गौरीशंकर युवा महोत्सव ‘परिवर्तन २०१५’ मुळे माझ्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला आहे,’ असे मत मिस इंडिया युनिव्हर्स विजेती व प्रसिद्ध अभिनेत्री मानसी मोघे हिने व्यक्त केले.गौरीशंकर नॉलेज सिटी लिंबच्या शैक्षणिक संकुलनात आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ती बोलत होती. मोघे म्हणाली, ‘येथील विद्यार्थ्यांचा उत्साह जोश चैतन्य पाहून कॉलेजलाईफ हेच जीवनातील खरे आनंदाचे अनमोल क्षण असतात, हे जाणवते. गौरीशंकरने हा भव्यदिव्य सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून युवाशक्तीच्या कलागुणाना संधी प्राप्त करून दिली आहे. येथील वातावरणाने मी भारावून गेली आहे.’
प्रारंभी मानसी मोघे हिच्या हस्ते गौरीशंकर महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक शिवाजी जगताप, चेअरमन मदन जगताप, चेअरमन मिलिंद जगताप, संचालिका रती जगताप, अनिरुद्ध जगताप, नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, दिग्दर्शक मानसिंग पवार, सिनेअभिनेते कश्यप परुळेकर, योगेश गुरव, प्राचार्य विजय राजे, अनुप पाटील पुरोगामी शिक्षणाचे मंडळाचे अध्यक्ष जयसिंग अण्णा देशमुख, नेताजी माने, सुभाष शितोळे, तुषार जगदाळे आदी प्रमुख उपस्थित होते.ग्रुप डान्समध्ये विजेत्या अनुक्रमे प्रथम क्रमांक गौरीशंकर पॉलिटेक्निक, लिंब. द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. यामध्ये सातारा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, लिंब, सातारा कॉलेज आॅफ फार्मसी देगाव, तृतीय क्रमांक विभागून सातारा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, लिंब, गौरीशंकर बी. फार्मसी, लिंब.कॉकटेल डान्समध्ये प्रथम क्रमांक गौरीशंकर बी. फार्मसी, लिंब. द्वितीय क्रमांक सातारा कॉलेज आॅफ फार्मसी, देगाव. तृतीय क्रमांक गौरीशंकर बी. फार्मसी, लिंब.फॅशन शो प्रथम क्रमांक सातारा कॉलेज आॅफ फार्मसी, देगाव. द्वितीय क्रमांक गौरीशंकर बी. फार्मसी, लिंब. तृतीय क्रमांक सातारा कॉलेज आॅफ फार्मसी देगाव. गायन प्रथम क्रमांक सातारा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, लिंब. द्वितीय क्रमांक गौरीशंकर आय. टी. आय. लिंब, तृतीय क्रमांक गौरीशंकर, बी. फार्मसी, लिंब. (प्रतिनिधी)