सातारा : वडिलांनी विकलेले घर परत न दिल्याने चिडून जाऊन युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना दौलतनगर येथे घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शरद नारायण फडतरे (रा. दौलतनगर, सातारा) याच्या वडिलांनी त्यांचे घर उदय बाबू पुजारी (वय ३५, रा. दौलतनगर, सातारा) यांना विकले आहे. हे घर पुजारी यांच्याकडून परत घेण्यासाठी शरद फडतरे याने त्याला विचारले. घर परत देण्यास पुजारी यांनी नकार देताच चिडलेल्या शरद फडतरेने आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका साथीदाराने पुजारीला बेदम मारहाण केली. पुजारी याच्या हातास, हनुवटीस, पाठीवर, खांद्यावर मार लागला आहे. पुजारी याने तक्रार दिल्यानंतर शरद फडतरे याच्यासह त्याच्या साथीदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 14:55 IST
वडिलांनी विकलेले घर परत न दिल्याने चिडून जाऊन युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना दौलतनगर येथे घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण
ठळक मुद्देविकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल