शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: बनावट फोन पेद्वारे सोने खरेदी, गंडा घालणाऱ्या तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:57 IST

सातारा : बनावट फोन पेद्वारे ज्वेलरी दुकानातून सोने खरेदी करून २२ हजारांना गंडा घालणाऱ्या तरुणाला सातारा शहर पोलिस ठाण्यातील ...

सातारा : बनावट फोन पेद्वारे ज्वेलरी दुकानातून सोने खरेदी करून २२ हजारांना गंडा घालणाऱ्या तरुणाला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने काही तासांतच अटक केली.फरीद राैफ बागवान (वय २४,रा. विक्रांतनगर, कोडोली, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरलक्ष्मी स्टाॅप येथील ब्रह्मचैतन्य ज्वेलरी शाॅप दुकानामध्ये दि. ६ रोजी फरीद बागवान हा सोन्याची कर्णफुले खरेदी करून दुकान मालकास फोन पेवरून पैसे ट्रान्सफर केले. त्याबाबतचा मेसेजही त्याने दाखविला. त्यानंतर दुकानदाराने पैसे आले नसल्याचे त्याला सांगितले. आपण आता पकडले जाऊ, अशी शंका आल्याने त्याने दुकानातून तातडीने बाहेर जाऊन दुचाकीवरून पळ काढला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली होती. गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश यादव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ यांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली.दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संशयिताचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला. यानंतर पोलिसांच्या पथकाने गोपनीय बातमीदारांमार्फत फरीद बागवानची ओळख पटवली. तो शिवराज पेट्रोलपंप परिसरात राहत असल्याचे समजल्यानंतर पोलिस पथकाने त्याला तातडीने अटक केली.बनावट ॲप्लिकेशन आढळले..पोलिसांनी फरीद बागवान याच्या मोबाइलची तपासणी केली असता त्यामध्ये फोन पे नावाचे ॲप्लिकेशन दिसून आले. हे ॲप्लिकेशन फक्त पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज फ्लॅश करते. एवढेच नव्हे तर खऱ्या फोन पे ॲप्लिकशेनसारखे दिसत असल्याने कोणाचाही त्यावर विश्वास बसेल. अशा बनावट फोन पेद्वारे फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी ॲपवर पैसे आल्याबाबत खात्री झाल्यावरच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस